केवळ ३९ नवे रूग्ण, चाचण्यांना होळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:43+5:302021-03-31T04:28:43+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २७ हजार ४७७ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ६२ झाली ...

केवळ ३९ नवे रूग्ण, चाचण्यांना होळीचा फटका
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २७ हजार ४७७ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ६२ झाली आहे. आतापर्यंत दोन लाख ७१ हजार ६५५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ४० हजार ७३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये मूल तालुक्यातील गर्डीसुर्ला येथील ५२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३८५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ १९, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
चंद्रपुरात २६ नवीन रूग्णांची नोंद
आज बाधित आढळलेल्या ३९ रूग्णांमध्ये चंद्र्रपूर मनपा क्षेत्रातील २६,
चंद्रपूर तालुका दोन, नागभीड एक, सिंदेवाही एक, राजूरा दोन, चिमूर एक, वरोरा तीन व इतर ठिकाणच्या तीन रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून बाहेर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.