सिमेंट कारखान्यातील अपघाताची ऑनलाईन चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:52+5:30

एसीसी चांदा सिमेंट वर्क हा कारखाना जिल्हातील पहिला कारखाना आहे. नऊ वर्षांपूर्वी या कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येऊन सिमेंट उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. कारखान्याच्या सुरक्षेबरोबर कामगाराची सुरक्षाही येथे गांभीर्याने बघितली जाते, असे सांगितले जात असतानाच हा अपघात झाला. तांत्रिक त्रृटीमुळे अपघात घडला काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Online inquiry into cement factory accident | सिमेंट कारखान्यातील अपघाताची ऑनलाईन चौकशी

सिमेंट कारखान्यातील अपघाताची ऑनलाईन चौकशी

Next
ठळक मुद्देकारखाना एक महिना होता बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील एसीसी चांदा सिमेंट कारखान्यातील सिमेंट उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या क्लिंकर सायलोच्या हापरमध्ये शेड कोसळल्याने सिमेंट उत्पादनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. घटनेची चौकशी केल्यानंतर कारण समोर येणार आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सदर चौकशी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.
एसीसी चांदा सिमेंट वर्क हा कारखाना जिल्हातील पहिला कारखाना आहे. नऊ वर्षांपूर्वी या कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येऊन सिमेंट उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. कारखान्याच्या सुरक्षेबरोबर कामगाराची सुरक्षाही येथे गांभीर्याने बघितली जाते, असे सांगितले जात असतानाच हा अपघात झाला. तांत्रिक त्रृटीमुळे अपघात घडला काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नैसर्गिक आपत्ती आली नसतानाही अचानक ही घटना घडली कशी, याचे चिंतन आता अधिकाऱ्यांकडून होत आहे. चौकशीअंती घटनेचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.
चौकशी अंती काही अधिकाऱ्यांवर गदा येणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र सध्या लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने ही चौकशी ऑनलाईन व्हिडीओ शुटींग व व्हीसीच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच ही चौकशी सुरू होणार आहे.

कारखाना एक महिना होता बंद
एसीसी चांदा सिमेंट वर्क हा कारखाना लॉकडाऊन काळात एक महिना बंद होता. त्या काळात कारखान्याचे सयंत्राच्या साफसफाईचे काम सुरू होते. शासनाने सिमेंट उघोगांना काही अटीवर कारखान्याचे उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली आणि आजच्या घडीला सिमेंट उत्पादन सरासरी ९० टक्के होत असताना बुधवारी दुपारी अचानक क्लिंकर सायलोवरील टिनेचे मोठे शेड सायलोत कोसळले. सदर घटनेमुळे पूर्ववत सिमेंट उत्पादन सुरळीत होण्यासाठी दोन महिने लागणार असल्याचे समजते.

Web Title: Online inquiry into cement factory accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात