जिल्ह्यातील ४२३ गावांत एक गाव - एक गणपती

By Admin | Updated: September 11, 2016 00:43 IST2016-09-11T00:43:40+5:302016-09-11T00:43:40+5:30

भक्तीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एकत्र यावे, त्यातून चांगल्या विचारांची आदानप्रदान व्हावी,...

One village in 423 villages - A Ganapati | जिल्ह्यातील ४२३ गावांत एक गाव - एक गणपती

जिल्ह्यातील ४२३ गावांत एक गाव - एक गणपती

लोकमान्य टिळकांच्या उद्देशाला अनेक गावांत हरताळ
गेल्या वर्षीपेक्षा लक्षणीय वाढ
चंद्रपूर : भक्तीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एकत्र यावे, त्यातून चांगल्या विचारांची आदानप्रदान व्हावी, या मूळ हेतूने लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेश स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. परंतु अलिकडील काही वर्षांत गावागावांत टिळकांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. गावातील सलोखा कायम रहावा, यासाठी एक गाव एक गणपतीची संकल्पना पुढे आली. मात्र या संकल्पनेलाही अनेक गावांमध्ये खो देण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील एक ‘गाव एक गणपती’ स्थापनेच्या आकडेवारीवरून ही बाब लक्षात येते. यावर्षी जिल्ह्यातील केवळ ४२३ गावांत एक गाव-एक गणपतीची संकल्पना प्रत्यक्षात साकरण्यात आल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक गाव - एक गणपतीच्या या प्रकारात लक्षणीय वाढ झाली आहे.
जिल्ह्यात एकूण चंद्रपूरसह १५ तालुके आहेत. या तालुक्यामध्ये एकुण ४२३ ठिकाणी एक गाव-एक गणपती ही संकल्पना अमलात आणली. मागील वर्षी जिल्ह्याभरात फक्त १४४ गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात एक गाव-एक गणपती या मोहीमेसाठी जनजागृती करण्यात आली. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्ह्यातील ४२३ गावांत एक गाव - एक गणपतीची स्थापना करण्यात आली. मात्र चिमूर तालुक्यातील फक्त ताळोधी नाईक या एकाच गावात एक गाव - एक गणपती स्थापन करण्यात आला. तर भद्रावती ४१, राजुरा १५, सावली १९, सिंदेवाही १६, कोरपना ३२, वरोरा ३३, ब्रह्मपुरी १७ यासह आदी तालुक्यात एकुण ४२३ एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात
एक गाव एक गणपतीची संकल्पना मुळात चांगली आहे. त्यासाठी गावकऱ्यांना पोलिसांकडूनही प्रोत्साहन दिले जाते. मात्र अनेक गावांतून प्रतिसादच दिला जात नसल्याचा अनुभव येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. गावगाड्याच्या राजकारणात एका गावाची चार शकलं पडली. मतभेदातून गटबाजी उफाळली. अनेक गावांमध्ये गटाची ताकद दाखविण्यासाठी गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे एका गावात चार ते पाच सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते. त्यातून मग या सार्वजनिक मंडळांमध्ये स्पर्धा सुरू होते. यातून गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण होण्याऐवजी त्यांच्या कटुताच अधिक निर्माण होते. अनेक मंडळातील कार्यकर्त्यांना तर गणेशोत्सवाचा इतिहासदेखील माहित नसतो. एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करायचे.
लोकांकडून वर्गणी गोळा करायची. त्या पैशातून मग उत्सव साजरा करायचा, अशीच परंपरा अलिकडे रुढ झाली आहे. हे चित्र खरे तर आता बदलायला हवे. गणेशोत्सव साजरा करताना त्यातून समाजप्रबोधन व्हावे, अशी अपेक्षा असते. मात्र तसे चित्र फार दिसत नाही. गावाच्या एकोप्यासाठी गणेशोत्सव हे चांगले माध्यम आहे. मात्र या उत्सवातही अलिकडे राजकारण शिरले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: One village in 423 villages - A Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.