कामगारांचा एक महिन्याचा पगार वेकोलिला भीक देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST2021-04-09T04:30:17+5:302021-04-09T04:30:17+5:30

युवा स्वाभिमान पक्ष व जय भवानी कामगार संघटनेचे आंदोलन राजुरा : वेकोलि सब एरिया बल्लारशा क्षेत्रांतर्गत राजुरा येथील ...

One month's salary of the workers will be given to Vekoli | कामगारांचा एक महिन्याचा पगार वेकोलिला भीक देणार

कामगारांचा एक महिन्याचा पगार वेकोलिला भीक देणार

युवा स्वाभिमान पक्ष व जय भवानी कामगार संघटनेचे आंदोलन

राजुरा : वेकोलि सब एरिया बल्लारशा क्षेत्रांतर्गत राजुरा येथील कार्यालयात व जी.आर.एन कंपनी येथे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवा स्वाभिमान पक्ष व जय भवानी कामगार संघटनेने गुरुवारी अभिनव आंदोलन केले.

गेल्या एक वर्षांपासून स्थानिक कामगारांचे मेस बिलच्या नावावर अनेक महिने बेकायदेशीररीत्या कापलेल्या पाच हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे पैसे परत केले नाहीत. आजपर्यंत अनेकदा बैठकी झाल्या. प्रत्येक बैठकीमध्ये पैसे परत करतो, असे उत्तर कंपनीकडून देण्यात आले. अखेर आज जय भवानी कामगार संघटनेच्या वतीने वेकोली प्रशासन व कंपनी यांना पैसे कमी असल्याने एक महिन्याचा पगार कामगारांनी देऊ केला अर्थात तो त्यांनी घेतला नाही. परंतु वेकोलि झाली भिकारी कामगारांच्या पैशांवर डल्ला मारी अशी घोषणाबाजी करत आज जय भवानी कामगार संघटनेचे सुरज ठाकरे व सर्व कामगारांनी आंदोलन केले. या आंदोलनांमध्ये दिलेल्या निवेदनामध्ये जीआरएन कंपनी व वेकोलि प्रशासनास कामगारांनी एक महिन्याचा पगार भिक म्हणून देण्याचा प्रस्ताव दिला आहे*. याशिवाय कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळावे. पीएफ व बोनस बरोबर मिळावे. या मागण्या व इतर मागण्यांचा उल्लेख दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे.या सर्व मागण्या २० एप्रिलपर्यंत पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल व साखळी उपोषण वेकोली कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे*.

Web Title: One month's salary of the workers will be given to Vekoli