एकाच वैद्यकीय अधिकारी सांभाळतो १८ गावांचा भार
By Admin | Updated: September 18, 2014 23:33 IST2014-09-18T23:33:27+5:302014-09-18T23:33:27+5:30
घुग्घुस शहराची लोकसंख्या ५० हजारांच्यावर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रार्तगत जवळपास १८ गावे येतात. या अठरा गावांचा कारभार एकच वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे. घुग्घुस परिसरात

एकाच वैद्यकीय अधिकारी सांभाळतो १८ गावांचा भार
घुग्घुस : घुग्घुस शहराची लोकसंख्या ५० हजारांच्यावर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रार्तगत जवळपास १८ गावे येतात. या अठरा गावांचा कारभार एकच वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे. घुग्घुस परिसरात सध्या तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्याला १८ गावांचा कारभार पाहताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
घुग्घूस परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मागील अडीच महिन्यांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वाकदकर हे कार्यरत आहेत. त्यांना परिसरातील १८ गावांच्या आरोग्याची जबाबदार सांभाळावी लागत आहे. सध्या घुग्घूस परिसरात तापाची साथ सुरू आहे. त्याामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज अनेक रुग्ण तपासणीसाठी येतात.
या सर्व रुग्णांना उपचार करताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात लांबचलांब रांगा दिसून येतात. वातावरणातील बदलामुळे रोगराई पसरत आहे. मलेरिया डेंंग्यूसारख्या तापाची साथ आहे. तापाच्या साथीचे बरेच रुग्ण आहेत. त्यात एकच वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी रुग्णालयाच्या मागे निवासस्थाने बांधली आहेत. परंतु त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या परिसरात झाडेझुडपे वाढलेली आहेत. वीज पुरवठा नाही. घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे तिथे कोणीही राहात नाही. शासनाने बांधलेली निवासस्थाने धूळखात आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना भाड्याने राहावे लागत आहे. (वार्ताहर)