एक लाखाचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:37+5:302021-03-29T04:16:37+5:30

भद्रावती : वणी पाटाळा मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना देशी विदेशी दारू साठ्यासह आठ लाखाचा ...

One lakh liquor seized | एक लाखाचा दारूसाठा जप्त

एक लाखाचा दारूसाठा जप्त

भद्रावती : वणी पाटाळा मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना देशी विदेशी दारू साठ्यासह आठ लाखाचा मुद्देमाल माजरी पोलिसांनी जप्त केला. यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान करण्यात आली.

हर्षवर्धन दिवाकर निमगडे (२५), सचिन अशोक नेरकर (३४), रोशन हरिदास उराडे (३६) सर्व रा. चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून हे एमएच ४६ एल ४६४६ या क्रमांकाच्या वाहनाने वणीहून पाटाळा मार्गे वरोऱ्याकडे जात असताना माजरी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. यात देशी-विदेशी दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. यातील तिन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई ठाणेदार विनीत घागे, सपोनी अजित सिंग देवरे, किशोरे मित्तरवार, अतुल गुरनुले, श्रीकांत मोगरम, गुरु शिंदे, अमोल रामटेके यांनी केली.

Web Title: One lakh liquor seized