एक लाख ५० हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST2021-06-04T04:22:12+5:302021-06-04T04:22:12+5:30

साजिद शकील शेख (२३, रा. चंडिका वॉर्ड) असे आरोपीचे नाव असून त्याच्या घरी सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती ...

One lakh 50 thousand worth of fragrant tobacco seized | एक लाख ५० हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

एक लाख ५० हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

साजिद शकील शेख (२३, रा. चंडिका वॉर्ड) असे आरोपीचे नाव असून त्याच्या घरी सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे घराची झडती घेतली असता त्याच्या घरी ३७० डब्बे सुगंधित तंबाखू आढळून आला. एक लाख ५० हजार रुपये त्याची किंमत आहे. विशेष म्हणजे संचारबंदीच्या काळात इतर व्यावसायिकांची दुकान बंद असली तरी सुगंधित तंबाखू विक्रीचे प्रमाण शहरात गल्लोगल्ली सुरू आहे. मात्र या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे लक्ष नाही. यावर अंकुश आणण्यासाठी भद्रावती पोलिसांनी विशेष मोहीम उभारली आहे. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागप्रमुख अमोल तुळजेवार, केशव चिटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदमवार यांनी केली.

===Photopath===

030621\img-20210603-wa0070.jpg

===Caption===

एक लाख पन्नास हजाराचा सुगंधित तंबाखू जप्त

Web Title: One lakh 50 thousand worth of fragrant tobacco seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.