तालुक्यात एक लाख १४ हजार १५७ जणांनी केले गोळ्यांचे सेवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:37+5:302021-07-19T04:18:37+5:30
बल्लारपूर : राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुका अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गजानन मेश्राम यांच्या ...

तालुक्यात एक लाख १४ हजार १५७ जणांनी केले गोळ्यांचे सेवन
बल्लारपूर : राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुका अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गजानन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील एक लाख १४ हजार १५७ लाभार्थ्यांना मनुष्यबळ पथकाने गोळ्या खाऊ घातल्या आहेत.
या मोहिमेत ग्रामीण भागात ८० जणांच्या चमूने ३२ गावांत घरोघरी जाऊन ३८ हजार ५५९ लाभार्थ्यांना तर शहरी भागात ३६० जणांच्या चमूने घरोघरी जाऊन ७५ हजार ५९८ लाभार्थ्यांना गोळ्या खाऊ घातल्या. यामध्ये प्राथमिक आरोग्य विसापूर अंतर्गत नऊ गावांत १३ हजार ६८६, कळमना प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या १२ गावांमधील ११ हजार ९३३ जणांना व कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत येणाऱ्या ११ गावांतील १२ हजार ९४० लाभार्थ्यांना हत्तीरोग दुरीकरणच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्या. बल्लारपूर शहरात ७५ हजार ५९८ लाभार्थ्यांना गोळ्या खाऊ घालण्यात आल्या. तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालयाने ही मोहीम यशस्वी करण्यास सहकार्य केले.