चंद्रपूरमध्ये अलगीकरण कक्षातील एकाची आत्महत्या, दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:13 PM2020-05-30T12:13:12+5:302020-05-30T12:13:35+5:30

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला.

One commits suicide in Chandrapur, another dies accidentally | चंद्रपूरमध्ये अलगीकरण कक्षातील एकाची आत्महत्या, दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू

चंद्रपूरमध्ये अलगीकरण कक्षातील एकाची आत्महत्या, दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला.
यापैकी चंद्रपूर येथील श्याम नगर भगतसिंग चौक येथील रहिवासी असणाऱ्या ३० वर्षीय युवकाने सकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहातील अलगीकरण कक्षात सकाळी ७.३० च्या सुमारास आत्महत्या केली. हा युवक नागपूर येथून आल्यानंतर अलगीकरण कक्षामध्ये होता.
दुसऱ्या घटनेत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवासी कक्षामध्ये (शासकीय निवासस्थान) आपल्या कुटुंबासह अलगीकरणात असणाऱ्या ४० वर्षीय नागरिकाचा प्रकृती अस्वास्थामुळे आकस्मिक मृत्यू झाला. मूळचे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील शिरपूर गावाचे आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत यावेळी होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. कुटुंबासोबत त्यांचा सकाळी संवादही झाला. सकाळी साडेसातला ते आराम करत होते. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दोन्ही मृतकांचे कोरोना स्वॅब देखील घेण्यात येणार आहेत. या दोन्हीही रुग्णांची प्रकृती स्थिर होती. दोन्हीही रुग्ण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये अलगीकरणात होते. या दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

Read in English

Web Title: One commits suicide in Chandrapur, another dies accidentally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.