चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एक बैल ठार तर तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 10:56 IST2018-06-20T10:56:33+5:302018-06-20T10:56:41+5:30

सिंदेवाही तालुक्यात असलेल्या खैरी चक (गुंजेवाही) येथे गुरुवारी पहाटे ६.३० च्या सुमारास शेताकडे जात असताना एका बैलगाडीवर वीज पडून त्यात एक बैल ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

One Bull killed and three persons injured in Chandrapur district due to Thunder electricity | चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एक बैल ठार तर तिघे जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एक बैल ठार तर तिघे जखमी

ठळक मुद्देशेताकडे जात असताना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यात असलेल्या खैरी चक (गुंजेवाही) येथे गुरुवारी पहाटे ६.३० च्या सुमारास शेताकडे जात असताना एका बैलगाडीवर वीज पडून त्यात एक बैल ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
सकाळच्या वेळी शेतात जात असताना अचानकपणे वीज बैलगाडीवर कोसळली. यात बैल जागीच ठार झाला तर नेताजी तुळशीराम वाडगुरे (४५), कु. निलीमा प्रकाश वाडगुरे (१०), तेजस नेताजी वाडगुरे (१२) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिंदेवाही येथे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अपघातग्रस्तांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: One Bull killed and three persons injured in Chandrapur district due to Thunder electricity

टॅग्स :Accidentअपघात