शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुलाची जात सिद्ध करण्यासाठी वृद्धाची पायपीट

By admin | Updated: October 9, 2015 01:41 IST

सद्यस्थितीत नोकरी दुर्लभ झाली आहे. ती एखाद्याला नशिबानेच मिळते. मोहाळी येथील एका युवकाला ती मिळाली.

नागभीड: सद्यस्थितीत नोकरी दुर्लभ झाली आहे. ती एखाद्याला नशिबानेच मिळते. मोहाळी येथील एका युवकाला ती मिळाली. नोकरीवर तो रुजुही झाला. पण नोकरीवर लागलेल्या त्या मुलाची ‘जात’ सिद्ध करण्यासाठी त्याचा वृद्ध पिता तीन महिन्यांपासून जीवाचा आटापिटा करीत असला तरी अपयशच याच्या पदरी येत आहे.रामकृष्ण हिरामण ऊईके असे वृद्धाचे नाव असून तो नागभीड तालुक्यातील मोहाळी (मोकासा) येथील रहिवासी आहे. रामकृष्णला दोन मुले असून त्यातील एकाला नुकतीच सरकारी नोकरी लागली. नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्याला इतर कागदपत्रासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश हाती पडताच मुलाने वडिलांना याविषयी कळविले.दैव योगाने मुलाला नोकरी मिळाल्याने वडीलही कामाला लागले. रामकृष्णाने त्यांच्याच एका नातेवाईकाची जातपडताळणी झाली असल्याने त्यांचेच कागदपत्र जोडून केस फाईल केली. पण संबंधित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण नामंजूर केले व तुमच्याच वडील-आजोबाचा १९५० पूर्वीचा सबळ पुरावा जोडा, असे सांगण्यात आले.आता १९५० पूर्वीच्या सबळ पुराव्यासाठी रामकृष्णाची सारखी पायपीट सुरुआहे. त्यांच्या पूर्वजाना शेती नसल्याने पी वन मिळत नाही. वडिलांनी आतापर्यंत आपला मुक्काम तीन गावांत हलविला. त्या तीनही गावांचे त्यांनी रेकॉर्ड तपासले. पण घरात कोणीच शाळेची पायरी चढली नसल्याने कोणताही पुरावा त्यांना मिळाला नाही.येथील तहसील कार्यालय, कलेक्टर आॅफीस, पंचायत समिती, पोलीस ठाणे, भूमी अभिलेख कार्यालय, आदी सर्व कार्यालये त्यांनी पालथी घातली आहेत. पण सबळ पुरावा त्यांना मिळत नाही. ते हतबल झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)