शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Updated: March 13, 2017 00:35 IST

छत्तीसगड येथील माओवादी हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथील नंदकुमार देवाजी आत्राम हे शनिवारी शहीद झाले.

फैरी झाडून पोलीस दलाची मानवंदना : सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर यांचीही आदरांजलीचंद्रपूर : छत्तीसगड येथील माओवादी हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथील नंदकुमार देवाजी आत्राम हे शनिवारी शहीद झाले. त्यांच्या शहीद होण्याची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. परिसरातील गावांवर शोककळा पसरली. या वीर जवानाचे पार्थीव त्यांच्या मूळगावी बोर्डा येथे रविवारी आणल्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी झालेल्या माओवादी हल्ल्यात नंदकुमार आत्राम शहीद झाले होते. सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या कारवाया सुरू असतात. यापूर्वीही माओवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे मोठे बॉम्बस्फोट घडवून काँग्रेस नेत्यांचे खून केले होते. त्यानंतरही माआवाद्यांनी अनेक घातपाताच्या कारवाया केल्या आहेत. त्यांच्याविरोधात शनिवारीदेखील केंद्रीय राखीव दलाचे जवान कर्तव्यावर असताना माओवाद्यांनी हल्ला चढविला. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात बोर्डा येथील नंदकुमार आत्राम शहीद झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव रविवारी दुपारी बोर्डा येथे आणण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, पोलिस अधिक्षक संदीप दिवान यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मंत्रीद्वयांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. (प्रतिनिधी)शहीद स्मारक उभारणार -सुधीर मुनगंटीवारशहिदाच्या कुटुंबीयांना १० लाख रूपयांची मदत दिली जाणार असल्याचे यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच गावात शहिदाच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रेरणादायी स्मारक बांधणार असल्याचे ते म्हणाले. राज्य शासनातर्फे ही मदत दिली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.अंत्यसंस्कारला हजारोंची उपस्थितीशहीद नंदकुमार आत्राम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला. तसेच अंत्ययात्रेत बोर्डासह आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गावकऱ्यांनी जड अंत:करणाने त्यांना अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी पोलिस दलाच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.