‘त्या’ जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: October 29, 2016 00:50 IST2016-10-29T00:50:31+5:302016-10-29T00:50:31+5:30
झारखंड राज्यातील रांची येथे सीआयएसएफमध्ये कार्यरत जवान अंगद भानुदास घुले यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

‘त्या’ जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शेणगाव/ टेकामांडवा : झारखंड राज्यातील रांची येथे सीआयएसएफमध्ये कार्यरत जवान अंगद भानुदास घुले यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आज शुक्रवारी रॉची येथून त्यांच्या जन्मगावी पोहचले. या ठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंगद घुले यांचे पार्थिव स्वगृही पोहचताच पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या शेतामध्ये नेण्यात आले व तिथे सीआयएसएफच्या जवानांकडून मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्यासाठी रॉची येथील त्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच सीआयएसएफचे जवान उपस्थित होते. टेकामांडवा येथील पोलीस उपनिरीक्षक तसेच पंचायत समितीचे उपसभापती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.