चंद्रपुरातील ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 14:37 IST2021-07-14T14:37:24+5:302021-07-14T14:37:50+5:30
Chandrapur Newsओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

चंद्रपुरातील ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे राष्ट्रवादीत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. डॉ. अशोक जीवतोडे हे चंद्रपुरातच नव्हे तर विदर्भात ओबीसी चळवळ पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या रूपाने विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी नेतृत्व मिळाल्याचे बोलले जात आहे.