चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३; एकाच दिवशी २५ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:11 PM2020-07-18T12:11:18+5:302020-07-18T12:11:41+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची रविवारी दुपारी २२८ असणारी संख्या रात्री उशिरा आणखी १५ बाधितांची भर पडल्यामुळे २४३ झाली आहे.

The number of victims in Chandrapur district is 243; 25 corona in one day | चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३; एकाच दिवशी २५ कोरोनाबाधित

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३; एकाच दिवशी २५ कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देबिहारमधून आलेल्या १२ कामगारांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची रविवारी दुपारी २२८ असणारी संख्या रात्री उशिरा आणखी १५ बाधितांची भर पडल्यामुळे २४३ झाली आहे. बुधवारी २१८ असणारी ही संख्या २४ तासात २५ बाधित पुढे आल्याने २४३ झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर व भद्रावती या शहरात लॉक डाऊन सुरू केल्यानंतर चाचण्या वाढविण्यात आल्या होत्या. आता दहा दिवसांसाठी चंद्रपूर शहर देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले असून आरोग्यसेतूचा वापर व अ‍ॅन्टीजेन चाचणीमुळे बाधितांची संख्या आणखी वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक १८ जुलै रोजी रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत आलेल्या पंधरा बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर क्षेत्रातील एक, सिंदेवाही ग्रामीण भागातील एक, मूल ग्रामीण भागातील एक, आणि अन्य राज्यातील १२ बाधितांचा समावेश आहे. यापूर्वी १७ जन जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जन अन्य राज्याचे रहिवासी होते. बिहारमधील आता १२ जणांची भर पडल्याने अन्य राज्यातील बाधितांची संख्या २९ झाली आहे
रात्री उशिरा आलेल्या १५ बाधितांमध्ये सिंदेवाई तालुक्यातील नल्लेश्वर येथील २५ वर्षीय युवकांचा समावेश आहे. हैदराबाद येथून हा युवक सिंदेवाही येथे आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरण होता.

मूल तालुक्यातील दाबगाव येथील ३१ वर्षीय युवकाची  वेळेत तपासणी झाली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिवारातील पत्नी, मुलगा, वडील यांचेही स्वॅब घेण्यात आले आहे.
राज्य राखीव पोलिस दलाचा ३१ वर्षीय आणखी एक जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. यापूर्वीच्या पॉझिटिव्ह पोलीस जवानाच्या संपकार्तील हा जवान असून संस्थात्मक अलगीकरणात असताना स्वॅब घेण्यात आला होता.

उर्वरीत अन्य बारा जण हे मुल येथील एका 'राईस मिल ' मध्ये काम करणारे कामगार आहेत. हे सर्व कामगार मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहे. १२ जुलै रोजी हे सर्व बिहारमधून मुल येथे आले आहेत. या सर्व कामगारांना मुल येथेच संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सरासरी ३० वयोगटातील हे सर्व पुरुष कामगार असून त्यांना बिहार येथून एका वाहनात घेऊन येणारा मूळ बिहार येथील रहिवासी असणारा ४४ वर्षीय चालक देखील पॉझिटिव्ह ठरला आहे. कोरोना चाचणीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अ‍ॅन्टीजेन चाचणीच्या निष्कर्षात हा चालक पॉझिटीव्ह ठरला आहे.

तत्पूर्वी शुक्रवार दि. १७ जुलै रोजी आरोग्य विभागाने गुरुवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार १० बाधितामध्ये चंद्रपूर शहरासह, तालुक्याच्या व ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग आहे.यामध्ये चंद्रपूर शहरातील २ नगरपरिषद क्षेत्रांमधील २ व ग्रामीण भागातील ६ बाधितांचा समावेश होता.
चंद्रपूर शहरातील खोतवाडी वार्ड रामदेव बाबा मंदिर चौकातील ४९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा १४ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.

चंद्रपूर शहरातील दुसरा पॉझिटिव्ह आरोग्य सेतू पने पुढे आणला आहे. व्यवसायाने ड्रायव्हर असणाऱ्या बीजेएम कारमेल अकॅडमी जवळील तुकूम परिसरातील ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. जालना येथे प्रवास केल्याची नोंद आहे. त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती गृह अलगीकरणात ठेवण्यात आली आहे.
खुटाळा चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या ५६ वर्षीय कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कामगारांची पत्नी झारखंड वरून १४ जुलै रोजी परत आल्याची नोंद आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव पोळे येथील रहिवासी असणाऱ्या २६ वर्षीय नागरिकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. हैद्राबाद येथून १० जुलै रोजी कारने चंद्रपूर जिल्हयात आल्यानंतर एका खासगी हॉटेलमध्ये ते संस्थात्मक अलगीकरणात होते.
ऊर्जानगर परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय अभियंत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर कोराडी येथून १० जुलै रोजी परत आलेल्या अभियंत्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. १४ जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला.

ऊर्जानगर येथील कोनाडी वार्ड परिसरातील रहिवासी असणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे.
तसेच ऊर्जानगर परिसरातील नेरी वार्ड येथे रहिवासी असणाऱ्या आणखी एका ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राजुरा नगरपालिका क्षेत्रातील नदी मोहल्ला परिसरातील एका कुटुंबातील बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बिहारच्या धनपूर येथून प्रवास केल्याची नोंद या परिवाराची आहे. त्या परिवारातील सर्वांचे स्वॅब १५ जुलै रोजी घेण्यात आले होते

वरोरा तालुक्यातील आमडी येथील रहिवासी असणाऱ्या २४ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ जुलै रोजी हा युवक पुणे येथून बसने प्रवास करीत आपल्या गावाला पोहचला होता. आल्यापासून तो गृह अलगीकरणात होता.

ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील रहिवासी असणारा ३३ वर्षीय केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. १२ जुलै रोजी ब्रह्मपुरी येथे आल्यानंतर १५ जुलै रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित 243 झाले आहेत. आतापर्यत 120 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. 243 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 123 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत

Web Title: The number of victims in Chandrapur district is 243; 25 corona in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.