शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

आता ॲपवरच मिळणार व्हीआयपी नंबर ! २५ पासून ऑनलाइन सेवेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:33 IST

Chandrapur : आरटीओतील गर्दी ओसरली; पसंतीच्या क्रमांकासाठी आता होणार नाही चक्कर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तुम्हाला तुमच्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक हवा असेल, तर आरटीओ कार्यालयात जाण्याची, अर्ज करण्याची कटकट आता संपली आहे. परिवहन विभागाने पसंतीच्या क्रमांकासाठी सॉफ्टवेअर विकसित केले असून, ही सेवा राज्यभरातील आरटीओ कार्यालयांशी संलग्न करण्यात आली आहे. चंद्रपूर आरटीओ कार्यालयात सोमवार दि. २५ नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज व शुल्क भरून पसंतीचा क्रमांक मिळणार आहे.

आपल्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक मिळावा, यासाठी अनेकजण वाटेल ती किंमत मोजतात. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पायऱ्या झिजवतात. अशावेळी पसंतीचा क्रमांक मिळवून देण्याच्या बहाण्याने दलालांची साखळी वाहनमालकांची लूटही करते, परंतु परिवहन विभागाने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. राज्यभरात ही सेवा कार्यन्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून वाहनधारकांनी त्यांच्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक मिळावा, म्हणून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

'व्हीआयपी' नंबरसाठी कायपण ! आजच्या तरुणाईमध्ये व्हीआयपी नंबरची मोठी क्रेझ दिसून येते. त्यासाठी ते लाखो रुपये मोजत असल्याचे दिसून येते.

दुचाकी अन् चारचाकीचा नंबर हवाय सेम-सेम ! अनेकांकडे दुचाकी व चारचाकी असेत. अशा चालकांना दोन्ही वाहनाला सेम- सेम नंबर हवा असतो. त्यासाठी ते प्रयत्न करत असतात.

याप्रकारच्या नंबर्ससाठी जास्त आटापिटा... ०१,०७, ००१, ११११, ५५५५, ०७८६, ७७७७ अशा प्रकारचे तर कुणी जन्मतारखेचे नंबर मिळविण्यासाठी आटापिटा करतात.

'व्हीआयपी' वाहनांची संख्या वाढली आजच्या तरुणांना व्हीआयपी वाहन वापरण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. अनेकांकडे दोन ते पाच लाखांपर्यंत दुचाकी तर १० लाखांपासून ७० २ लाखांपर्यंत चारचाकी खरेदी केल्याचे दिसून येते.

असा करा ऑनलाइन अर्ज १ पसंतीच्या क्रमांकासाठी https://fancy. parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर नाव, आधार संलग्नित मोबाइल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी. त्यानंतर अर्ज आणि शुल्काचा भरणा करून पसंतीचा क्रमांक आरक्षित करता येतो.

२२ लाखाची एसयूव्ही; नंबरसाठी मोजले दीड लाख रुपये वाहन खरेदीसाठी लाखो रुपये मोजल्यानंतर आवडीच्या नंबरसाठीही लाखो रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र दिसून येते.

दलालांचा पत्ता कट होणार पसंतीचा नंबर मिळवून देण्याच्या अनुषंगाने अनेक दलाल सक्रीय असतात. मात्र आता ऑनलाइन पद्धतीने काम होणार असल्याने दलालांचा पत्ता कट होणार आहे.

आरटीओ म्हणतात... "फेसलेस सेवेमुळे आरटीओतील बहुतांश सेवेचा लाभ घरबसल्या घेता येतो. आता फॅन्सी नंबरसुद्धा ऑनलाइन पद्धतीने आरटीओ कार्यालयात न येता घरबसल्या आरक्षित करता येणार आहे. आरक्षित केलेला नंबर पूर्वी एकच महिना व्हॅलिड असायचा मात्र आता हा नंबर सहा महिने व्हॅलिड राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यंत सोईचे झाले आहे." - किरण मोरे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरRto officeआरटीओ ऑफीस