शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

१०,१२ वीच्या परीक्षा केंद्रासाठी आता सुधारीत निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली.

ठळक मुद्देसुविधा नसलेल्याशाळा वगळणार : ३१ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहावी आणि बारावीच्या परिक्षाकेंद्रासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यामुळे या निकषांना अनुसरून जिल्ह्यातील शाळांची माहिती ३१ आॅगस्टपर्यंत पाठविण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित निकष जाहीर केले. या नवीन निकषानुसार शाळा व्यवस्थापकांना सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. केंद्र व्यवस्थापनासाठी दोन वर्गखोल्या आणि २५ विद्यार्थ्यांमागे एक वर्गखोली या प्रमाणात वर्गखोल्या असाव्यात. इमारतीच्या खिडक्यांना बारीक जाळ्या असाव्यात, दुहेरी बेंच प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावे लागणार आहे. प्रत्येक वर्गखोलीमध्ये वीज जोडणीसह किमान २ ट्युब एलईडी व पंखे असावेत. अद्यावत संगणक प्रिंटरसह इंटरनेट सुविधा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना नवीन निकषानुसार केंद्रासाठी प्रथम प्राधान्य दिल्या जाणार आहे.परीक्षा कालावधीत केंद्राचे जनरेटर व्यवस्थित असावे, सर्व वर्गखोल्यांमध्ये दिवे, पंखे चालू राहतील इतक्या क्षमतेचे असावे. पर्यायी व्यवस्था म्हणून इनर्व्हटर, सौरउर्जा व अन्य सुविधा सज्ज ठेवण्याची जबाबदारी शाळेची आहे. अद्यावत अग्निशामक यंत्रणा व शाळेभोवती चारही बाजूने सुरक्षाभिंत असली पाहिजे. मुलामुलींसाठी स्वतंत्र व विद्यार्थी संख्येनुसार पुरेशी स्वच्छतागृहे असावीत.या स्वच्छतागृहांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा असावा. केंद्र शाळेत प्रथमोपचार आरोग्य पेढी ठेवावी लागणार आहे. केंद्रापासून वैद्यकीय सुविधा पोस्ट आॅफीस, बसव्यवस्था, पोलीस स्टेशनजवळच्या अंतरावर असावेत. परीक्षा विषयक गोपनीय साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी सोय व सुरक्षितता असावी. परिक्षा केंद्रावर दोन महाविद्यालये ही एकाच संस्थेची नसावीत. नव्याने सांकेतांक प्राप्त शाळा, महाविद्यालयांना शक्यतो दोन वर्षांपर्यंत परिक्षा केंद्र देण्यात येऊ नये. नवीन केंद्रांना तीन वर्षांकरिता केंद्र संचालक हा त्या शाळेव्यतिरिक्त अन्य घटकांतून विभागीय मंडळाकडून देण्यात येणार आहे. असे सुधारित निकष नवीन परीक्षा केंद्रासाठी लागू करण्यात आले आहेत.विद्यार्थी संख्या वगळता ज्या अटींवर परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आले. त्या अटींचे पालन केले नाही, तर केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्राना प्रथम सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहे.शाळांना द्याव्या लागणार सुविधाशाळा, महाविद्यालयांना परीक्षा केंद्र अबाधित ठेवायचे असेल तर नवीन निकषानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या निकषानुसार ग्रामीण आणि दुर्गम भागातील केंद्रांना मोठी कसरत करावी लागणार आहे.बोगस प्रकार थांबतीलदहावी आणि बारावीमध्ये पास होण्यासाठी अनेक विद्यार्थी गैरमार्गाचा वापर करतात. हा प्रकार टाळण्यासाठी परीक्षा मंडळाने नवीन निकष जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात परीक्षेदरम्यान करण्यात येणारे गैरप्रकार थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षण