Now the Prime Minister's Kisan Honor Yojana for farmers | शेतकऱ्यांसाठी आता प्रधानमंत्री किसान मानधन योजना
शेतकऱ्यांसाठी आता प्रधानमंत्री किसान मानधन योजना

ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगता यावे, याकरिता त्यांना आर्थिक मदत व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली असून याचा लाभ मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
बहुतेक शेतकरी वृद्धावस्थेतील निवार्हासाठी अत्यंत अल्प बचत करतात किंवा बहुतांश शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा इतर स्रोत उपलब्ध नसतो. अशा अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करता यावी व वृद्धापकाळात आनंदी जीवन जगता यावे, याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना यातून भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी याकडे सकारात्मकतेने बघण्याची गरज आहे.

नोंदणीसाठी आवश्यक पात्रता
प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना असून शेतकरी हा १ आॅगस्ट २०१९ रोजीच्या वयानुसार १८ ते ४० वर्षे या वयोगटातील असावा. तसेच तो अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी असावा. याशिवाय त्याच्याकडे आधार कार्ड व बँकेचे खाते असावे.


Web Title: Now the Prime Minister's Kisan Honor Yojana for farmers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.