आता शेतकऱ्यांना तीन हजार रूपये पेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:08 AM2019-09-01T01:08:41+5:302019-09-01T01:09:11+5:30

भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधाकर शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील उदरनिर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते. किंवा बहुताशी शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसते, अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

Now pension of three thousand rupees to the farmers | आता शेतकऱ्यांना तीन हजार रूपये पेंशन

आता शेतकऱ्यांना तीन हजार रूपये पेंशन

Next
ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान मानधन योजना। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना यापुढे तीन हजार रूपये मासिक पेंशन मिळणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधाकर शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील उदरनिर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते. किंवा बहुताशी शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसते, अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंतर्गत दरमहा तीन हजार रूपये निश्चित पेन्शन देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छीक व अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत भारतीय जीवन बीमा निमगव्दारे पेंशन फंडाव्दारे नोंदणीकृत पात्र शेतकºयांना पेंशन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वर्ष या वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. या योजनेंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकºयांना त्याचे १ ऑगस्ट २०१९ रोजीच्या वयानुसार ५५ ते २०० रूपये प्रतिमाह मासिक हप्ता वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत पेंशन फंडमध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पेंशन फंडमध्ये जमा केलेल्या मासिक हप्ताइतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकºयांच्या पेंशन फंडमध्ये जमा करणार आहे.
अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी पती-पत्नी स्वतंत्रपणे योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्यांच्या स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्रपणे तीन हजार रूपये मासिक पेंशन मिळणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या पात्र शेतकºयाला योजना बंद करायची असल्यास त्यांची जमा रक्कम व्याजासह परत मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकºयांनी सेवानिवृत्ती तारखेपूर्वी आकस्मित निधन झाल्यास त्या व्यक्तीचे ६० वर्ष वयापर्यंतचे उर्वरित मासिक हप्ते पती-पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करून त्या व्यक्तीचे पेंशन खाते चालु ठेवू शकतात. सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधीन झालेल्याच्या वारसदारांना रक्कम मिळणार आहे.

यांना मिळणार नाही योजनेचा लाभ
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(ए.पी.एस.) कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनाझेशन स्किम,यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी, कामगार आणि रोजगार मंत्रालयाव्दारे प्रशासित प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन योजनातील पात्र शेतकरी, उच्च आर्थिक स्थितीत असलेले म्हणजेच प्रधानमंत्री किसान माधन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील, जमीन धरण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी केलेली व्यक्ती, माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे माहापौर व जि. प. अध्यक्ष, शासकीय कर्मचाºयांनी यांना लाभ मिळणार नाही.

Web Title: Now pension of three thousand rupees to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती