निवडणूक अधिकाऱ्यांची आठ उमेदवारांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:31 IST2019-03-26T22:31:25+5:302019-03-26T22:31:43+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ८ उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी नोटीस बजावली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांची आठ उमेदवारांना नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ८ उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी नोटीस बजावली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सुशील सेगोजी वासनिक, नामदेव माणिकराव शेडमाके, मधुकर विठ्ठल निस्ताने, अशोकराव तानबाजी घोडमारे, नामदेव केशव किनाके, विद्यासागर कालिदास कासलार्वार आदी सहा उमेदवारांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अंतर्गत निवडणूक खर्चाचे सनियंत्रण सुकर करण्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी एक दिवसाच्या आत बँक खाते उघडले नव्हते. बँकेचे खाते क्रमांक उमेदवार नामनिर्देशन दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी कळविण्याची तरतूद आहे. मात्र, ८ उमेदवारांनी आपल्या नामनिर्देशनपत्रासोबत निवडणूक खचार्साठीचे स्वतंत्र बँक खाते तपशील लेखी स्वरुपात सादर केले नाही. याशिवाय दशरथ पांडुरंग मडावी, राजेंद्र श्रीराम महाडोळे या दोन उमेदवारांनी २० व २२ मार्च २०१९ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मात्र २६ मार्चपर्यंत दैनंदिन निवडणूक खर्चाचा तपशिल निवडणूक निर्णय अधिकारी खर्च सनियंत्रण विभागात सादर केला नाही. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक खचार्साठीचा स्वतंत्र बँक खात्याचा तपशील लेखी स्वरूपात व दैनंदिन निवडणूक खर्च तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी या संहितेचे पालन न केल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. जे उमेदवार खर्च विषयक लेखे विहित कालावधीत सादर करणार नाहीत. त्यांच्याविरुद्ध लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ व भारतीय दंड संहिता ८६० मधील कलम १७१ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.