ुचना:-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:37+5:302020-12-22T04:27:37+5:30
कुचना:- ○ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे लागले घुमायला ○ भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या ...

ुचना:-
कुचना:-
○ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे लागले घुमायला
○ भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच गावातील लगबग हालचाली ना वेग आला आहे.कुचना-थोराणा,माजरी, मणगाव,पाटाळा-राळेगाव ,नागलोन,चालबर्डी या परिसरात आता हालचालींना वेग आला आहे..यासाठी उमेदवार निवडण्यापासून तर कागदपत्रे तयार करण्याची भाऊगर्दी वाढली आहे..तर प्रस्थपित राजकारण्यांना ग्रामपंचायती वर आपलाच दबदबा असावा यासाठी राजकीय डावपेच कसे आखायचे याची तयारी चालु झाली आहे..
○ तर दुसरीकडे प्रस्थपित लोकांना आव्हान देण्यासाठी यावेळी तरुण वर्ग विशेषतः पुढे येताना दिसत आहे...भास्करराव पेरे पाटील यांचे आदर्श ग्राम व त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षित,तरुण,तसेच ग्रामविकासची आस असणारे ,आपल्याही गावात आदर्श परिवर्तन करण्यासाठी धडपडणारे युवक यावेळी निवडणुकीत इच्छुक असल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र तरी वाटत आहे...
○ असे असले तरी निवडणुका होताना आपापसात वैर नको ,निवडणुकीनंतर सर्व हेवे दावे विसरून सर्वांनी शाश्वत गावसेवेसाठी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे..
○ग्रामीण भागातील शेती व्यवसाय प्रमुख असल्याने शेतकऱ्यांसाठी वर्धा नदी, शिरणा नदी यासारख्या नद्यांवर जर नंदोरीसारखी मोठं मोठे बंधारे बांधण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सामूहिक प्रयत्न केल्यास व लोकप्रतिनिधींना तसे जागृत केल्यास जे क्षेत्र ड्राय झोन साठी परिचित आहे त्या क्षेत्रात कायमस्वरूपी पाण्याची उपाययोजना होऊन भविष्यात बागायती शेती आणि शेतीशी निगडित उद्योग झाल्यास येणाऱ्या दिवसात युवकांना सुद्धा रोजगाराच्या समस्या सुद्धा भेडसावणार नाही.
○तसेच हा परिसर म्हणजे जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून असल्याने अवैध धंदे ज्यात दारू,सट्टा, कोंबडबाजार ,रेतीतस्करी सुद्धा मोठ्या प्रमानत चालत असल्याने युवक वर्गात व्यसणाचे प्रमाण वाढून समाजविघातक कृत्याला चालना मिळते तर याच्या विरोधात निवडणुकातील मुद्दा झाल्यास बदलाची नांदी लागायला वेळ लागणार नाही..
○मात्र काहीही झाले तरी निवडणुकांमुळे गावचे गावपण आणि गावातील आपापसात असणारा गोडवा,आपुलकी,प्रेम जाता कामा नये..