उत्तर भारतातील ‘नवरंग’ नागभीडच्या शिवटेकडीवर
By Admin | Updated: August 30, 2014 23:33 IST2014-08-30T23:33:57+5:302014-08-30T23:33:57+5:30
उत्तर आणि उत्तर पूर्व भारत प्रदेशात वास्तव्यास असणारा ‘नवरंग’ हा पक्षी सद्यास्थितीत नागभीड तालुक्यातील घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात वास्तव्यास आला आहे. सध्याचा काळ या नवरंग

उत्तर भारतातील ‘नवरंग’ नागभीडच्या शिवटेकडीवर
घनश्याम नवघडे - नागभीड
उत्तर आणि उत्तर पूर्व भारत प्रदेशात वास्तव्यास असणारा ‘नवरंग’ हा पक्षी सद्यास्थितीत नागभीड तालुक्यातील घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात वास्तव्यास आला आहे. सध्याचा काळ या नवरंग पक्षाचा प्रजोत्पादनाचा काळ मानला जातो.
मराठीत या पक्षाचे नाव नवरंग असे असून इंग्रजीत याला ’ल्ल्िरंल्ल ढ्र३३ं असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत याचे नाव ढ्र३३ं इ१ंूँ८४१ं असे आहे. हा पक्षी मुख्यत्वे उत्तर पूर्व भारत व उत्तर भारतात वास्तव्यास असतो. हा पक्षी उन्हाळ्याच्या शेवटी मध्य भारत, कोकण व मलबार या ठिकाणी स्थानांतरण करुन घरटी बांधण्याचे काम कतो.
नागभीड तालुक्यातील घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात हा पक्षी वास्तव्यास आला आहे. हा पक्षी आपले घरटे झाडावर जमिनीपासून पाच मिटर उंचीवर बांधतो. घरटी बांधण्यासाठी गवत, पाने, दोरा, पिसे तसेच माती या साधनांचा वापर करतो. मादी चार ते सहा अंडी देते. अंडी उबवण्यास १५ ते १६ दिवसांचा अवधी लागतो. सध्या अंडी उबवण्याचा अवधी संपला असून, या पक्षाची पिले १० ते १२ दिवसांची झाली आहेत, अशी माहिती येथील पक्षी अभ्यासक सतीश चारथळ आणि प्रशांत वालदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
या पक्षाचा आकार आपल्याकडे दिसणाऱ्या ‘मैना’ या पक्षापेक्षा थोडा लहान आहे. पंखाचा रंग हिरवट व त्यावर निळ्या रंगाचा पट्टा असतो. डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी व गळ्याच्या भाग पांढऱ्या रंगाचा असतो. छाती पिंगट रंगाची असून पोटापासून तर शेपटीखालील भाग गदड लाल रंगाचा असतो. त्यामुळेच या पक्षाची सहज ओळख पटते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. उन्हाळ्याच्या शेवटच्या काळखंंडात येथे वास्तव्यास आलेला हा पक्षी प्रजोत्पादनानंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला परत आपल्या मुक्कामी निघून जातात. सध्या या पक्षाचा घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात वावर दिसून येत असल्याने पक्षीप्रेमींत या पक्षाविषयी उत्सुकता वाढली आहे.
(वार्ताहर)