शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचा आक्रोश रस्त्यावर

By admin | Updated: March 24, 2015 00:33 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत परिचालकांवर महाआॅनलाईन कंपनी अन्याय करीत आहे.

पालकमंत्र्यांचा निषेध : तीन महिन्यांपासून मानधनाविना सुरू आहे कामचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत परिचालकांवर महाआॅनलाईन कंपनी अन्याय करीत आहे. टार्गेटच्या नावाखाली कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधनही हडप करण्यात आले. जिल्ह्यातील ३०० ते ४०० परिचालकांना तीन महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संगणक परिचालकांचा आक्रोश सोमवारी रस्त्यावर उतरला. परिचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रशासन व पालकमंत्र्यांचा जाहिर निषेध केला.जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचे काम संगणकीकृत करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतींशी निगडित लहान-मोठी कामे संगणकांच्या माध्यमातून होत आहे. मात्र परिचालकांना केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपये मानधन दिले जात आहे. पगारवाढ, कायम नियुक्ती द्या आणि महाआॅनलाईनचा करार रद्द करावा या मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेने काही दिवसांपुर्वी संप केला होता. १२ नोव्हेंबर ते २२ जानेवारी २०१५ पर्यंत हा संतप चालला. यादरम्यान मुंबई येथे साखळी उपोषणही करण्यात आले. तेव्हा ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी महाआॅनलाईनचे कंत्राट रद्द करण्यासोबतच अन्य मागण्या सोडविण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र त्यानंतर संपात सहभागी झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने काढण्यात आले. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर त्यांना कामावरही घेण्यात आले. मात्र अजूनही २५ ते ३० परिचालकांना अजूनही कामावर घेण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून तीनशे ते चारशे संगणक परिचालकांचे मानधन रोखण्यात आले आहे. केवळ टार्गेटच्या नावाखाली मानधन हडप करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केला आहे. मानधनाबाबत वारंवार विचारणा केली, असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. ई- बँकिंग सुविधेअंतर्गत काम केलेल्या संगणक परिचालकांना कमिशन मिळाले नाही. कमीशन तत्काळ देण्यात यावे, शासकीय सेवेत सामावून घ्यावे, १२ हजार रुपये वेतन देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी आणि प्रवास भत्ता देण्यात यावा, थकीत मानधन अदा करावे, कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हा परिषदेत पोहोचला. संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र गेडाम, धनराज रामटेके, प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी) अधिकाऱ्यांची मनमानीग्रामपंचायतीच्या रेकॉर्डचे संगणकीकरण करण्यात आले आहे. मात्र संगणक परिचालकांना कामाव्यतीरिक्त विविध कामे अधिकाऱ्यांकडून सोपविली जात आहेत. मानधन कमी आणि काम जास्त अशी गत परिचालकांची झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.