शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षांपासून मिळाले नाही जमिनीचे पट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

महाकालीनगरात प्रामुख्याने गरीब कुटुंब राहतात. येथील जमीन दस्तावेज दुरूस्ती प्रकरणांच्या आदेशाची शासकीय फाईल जिल्हाधिकारी कार्यालयातून बेकायदा गहाळ झाल्याने मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही. या प्रकरणातील केवळ एका चुकीच्या आदेशामुळे झोपडपट्टीवासी मालकी हक्क आणि पाणी, वीज, रस्ते, पक्की घरे व विविध योजनांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देमहाकालीनगर झोपडपट्टीवर अन्याय : सोईसुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील महाकाली वार्ड परिसरात ७० वर्षांपूर्वी महाकालीनगर नावाची झोपडपट्टी वसविण्यात आली. यामध्ये सुमारे दीडशे कुटुंब राहतात. मात्र, जमिनीचे पट्टे न मिळाल्याने मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.महाकालीनगरात प्रामुख्याने गरीब कुटुंब राहतात. येथील जमीन दस्तावेज दुरूस्ती प्रकरणांच्या आदेशाची शासकीय फाईल जिल्हाधिकारी कार्यालयातून बेकायदा गहाळ झाल्याने मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही. या प्रकरणातील केवळ एका चुकीच्या आदेशामुळे झोपडपट्टीवासी मालकी हक्क आणि पाणी, वीज, रस्ते, पक्की घरे व विविध योजनांपासून वंचित आहेत. तत्कालीन उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) एस.एन. नागुलवार, यांनी जमीन दस्तावेज दुरूस्ती महसूल प्रकरण क्रमांक १४/ एल.एन.ए. २२/१९८९-९० रोजी पारीत केलेला आदेश ९ जानेवारी १९८९ च्या आदेशंशी संबंधित आहे, अशी माहिती सुधाकर कातकर यांनी दिली. या प्रकरणांच्या आदेशात सदर शासकीय नझुल जमीन पटेल यांच्या खासगी मालकी हक्कांची आहे. ती शासकीय जमीन त्यांना लिजवर सरकारकडून देण्यात आली नाही, असे चुकीने नमुद केल्याचा आरोपही कातकर यांनी केला. या प्रकरणाची भूमी अभिलेख कार्यालयात माहिती मागण्यात आली. परंतु, तिथे फाईल उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यायग्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.आज नागपुरात विधानभवनावर मोर्चामहाकालीनगरातील जमीन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. परंतु, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जमिनीचा तिढा सोडविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र, काहीच कार्यवाही होत नसल्याने महाकाली नगर झोपडपट्टीवासींनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी महासचिव सुधाकर कातकर यांच्या नेतृत्वात नागपूर येथे विधानभवनावर शुक्रवारी मोर्चा काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती टेकचंद कटरे यांनी दिली.‘त्या’ फाईलचा शोध सुरूझोपडपट्टीवासींनी गुरूवारी भूमी अभिलेख उपअधीक्षकांना निवेदन देऊन फाईल शोधण्याची मागणी केली. त्यामुळे संबंधित विभागाने शोधाशोध सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.