रेलस्थानकावर आता ‘नो बिल नो पेमेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:34+5:30

‘नो बिल नो पेमेंट’ या उपक्रमाबाबत, जो स्टॉल चालक प्रवाशांना बिल देणार नाही त्यांना रेल्वे प्रवाशी पेमेंट करणार नाही, असा आदेश आहे, असे प्लॅटफार्म क्रमांक १ चे स्टालचालक अशोककुमार शुगवाणी यांचे म्हणणे आहे. याशिवाय प्रत्येक स्टाल चालकाने किती प्रवाशांना बिल दिले, त्या बिलाची छायाप्रत वाणिज्य विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपर पाठविणे बंधनकारक आहे.

No bill no payment at railway station | रेलस्थानकावर आता ‘नो बिल नो पेमेंट’

रेलस्थानकावर आता ‘नो बिल नो पेमेंट’

ठळक मुद्देबल्लारशहा रेल्वेस्थानकाचा उपक्रम : वस्तुंच्या मनमानी दराला बसला आळा

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : प्रवाशांच्या सोईसाठी बल्लारशाह रेल्वेस्थानकावरील स्टॉलवरून कोणतीही वस्तू घेतल्यानंतर बिल देण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला. रेल्वेस्थानकावरील प्रत्येक स्टॉलवर बिल देण्याची मशीन ठेवली असून त्याच्या बाजूलाच ‘नो बिल नो पेमेंट’ चा बोर्ड लावण्यात आला आहे.
‘नो बिल नो पेमेंट’ या उपक्रमाबाबत, जो स्टॉल चालक प्रवाशांना बिल देणार नाही त्यांना रेल्वे प्रवाशी पेमेंट करणार नाही, असा आदेश आहे, असे प्लॅटफार्म क्रमांक १ चे स्टालचालक अशोककुमार शुगवाणी यांचे म्हणणे आहे. याशिवाय प्रत्येक स्टाल चालकाने किती प्रवाशांना बिल दिले, त्या बिलाची छायाप्रत वाणिज्य विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपर पाठविणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना विकल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या खाद्य पदार्र्थांची किंमत आगाऊ तर घेतली नाही ना याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळते, याकडेही शुगवाणी यांनी लक्ष वेधले.

प्रवाशांमध्ये वाढणार जागृती
बल्लारशहा रेल्वेस्थानकावर काही अनाधिकृत विक्रेत्यांकडून विविध प्रकारच्या वस्तु मनमानी दराने विकल्या जातात, अशी तक्रारी प्रवाशांनी केली होती. त्यामुळे हा अन्याय दूर व्हावा आणि रेल्वे प्रवाशांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी रेल्वे प्रशासना ‘नो बिल नो पेमेंट’ हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. रेल्वे प्रवाशांनी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही माहिती दिल्यास जागृतीची व्याप्ती वाढेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Web Title: No bill no payment at railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे