गोमांस विक्रीप्रकरणी नऊ जणांना अटक
By Admin | Updated: January 22, 2017 00:52 IST2017-01-22T00:52:29+5:302017-01-22T00:52:29+5:30
गोमांस विक्री करणाऱ्या नऊ जणांना दुर्गापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

गोमांस विक्रीप्रकरणी नऊ जणांना अटक
दुर्गापूर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर : गोमांस विक्री करणाऱ्या नऊ जणांना दुर्गापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. जामिन रहेमान कुरेशी (३८), नजीम बशीर कुरेशी (३२), आझम हासम कुरेशी (४८), आरीफ रहेमान कुरेशी (४०), खालीक रहेमान कुरेशी (५०), युनुस युसुफ कुरेशी (४०), यशुब हमजा कुरेशी (५०), रशिद हमजा कुरेशी (४८), रऊफ हमजा कुरेशी (५५) सर्व राहणार दुर्गापूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
काही व्यक्ती गोमांस कापत असल्याची गोपनीय माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दुर्गापूरचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वातील सहाय्यक फौजदार पिपरे, रजनीकांत, चंदू नागरे, दहागावकर यांच्यासह घटनास्थळी धाड घातली. यावेळी आरोपी गोमांस कापत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोघांना ताब्यात घेतले. अन्या सात जण पळून गेले होते. संध्याकाळी पळून गेलेल्या सातही जणांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून ६० किलो गोमांस, सुरी, सत्तूर, कुऱ्हाड, लाकडी कुंदा, चार बॅटरी, चार्जर असा एकूण २० हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्यात गोहत्या बंदी असतानाही गोमांस विकत असल्याने आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५च्या कलम ५ (क), ९ (अ), प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियमअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)