शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह नऊ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:35 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळेलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आइचर गाडीसह नऊ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान जुनोना जंगल परिसरात करण्यात आली.

ठळक मुद्देदोघांना अटक । राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळेलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आइचर गाडीसह नऊ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान जुनोना जंगल परिसरात करण्यात आली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. रवी मुर्तीराम आवळे रा. बल्लारपूर, शांतकुमार धनराज उपरे रा. बाबूपेठ चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.जुनोना जंगल परिसरात आइचर वाहनाने दारूसाठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर भरारी पथकाने जुनोना जंगल परिसराकडे सापळा रचला. सहा तास प्रतीक्षा केल्यानंतर रात्री १ वाजताच्या सुमारास सदर वाहन जुनोना जंगल परिसरात येताना दिसले. पोलिसांनी सदर वाहनास थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन न थांबविता जंगलात पसार झाले. पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहन थांबवले. वाहनाजवळ जाऊन वाहनाची झडती घेतली असता वाहनात देशी दारूचे ५४ बॉक्स आढळून आले. यावेळी गाडीमध्ये बसून असलेले रवी आवळे, शांतकुमार उपरे यांना अटक केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद भोयर, चंदन भगत, राहुल अत्रे, पुठ्ठलवार, चेतन अवचट, संदीप राठोड, अमोल भोयर यांनी केली.क्रांतीदिनी चिमुरात ९७ हजारांचा दारूसाठा जप्तचिमूर : देशात क्रांतिदिन साजरा होत असताना चिमूर पोलिसांनी आझाद वार्डातील एका घरी धाड टाकून ९७ हजार ८०० रुपयांची दारु जप्त केली. याप्रकरणी पती व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पती नंदू मोहिणकार याला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. आझाद वार्ड येथे दारुची विक्री होत असल्याची माहिती गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मोहिणकार यांच्या घरी धाड टाकली. यावेळी ६१ हजार ८०० रुपये किंमतीच्या १८० एमएलच्या ६१८ नग देशी दारूच्या बॉटल, ३६ हजार रुपये किंमतीच्या १२० नग इंपिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या बॉटल असा ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नंदू मोतीराम मोहिणकार याला अटक केली. ही कारवाई चिमूरचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, नापोशी किशोर बोढे, पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, कुणाल राठोड, मपोशी उज्वला परचके, विजय उपरे यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस