लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पती-पत्नी यांच्यात किरकोळ बाबीवरून वाद होणे हे अनेक ठिकाणी घडते. मात्र, या वादातून पुढे संसारच करायचा नाही, अशी काहीशी चुकीची भूमिका दाम्पत्य घेतात. त्यामुळे पत्नीचे पतीविरुद्ध किंवा पतीचे पत्नीविरुद्ध असे तक्रारीचे प्रमाण जिल्हा पोलिस दलाच्या भरोसा सेलकडे वाढले आहे. मागील काही वर्षामध्ये बायकोकडून छळ होत असल्याच्याही अनेक तक्रारी केल्या जात आहेत.
शहरासह जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात असो की थेट न्यायालयामध्ये कौटुंबिक वादाच्या घटनांचे आणि छळाच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यात पुरुषांनी पत्नीने केलेल्या छळाच्या प्रकरणेही वाढत आहेत. किरकोळ कारणातून झालेले वाद आणि त्यातून विभक्त होण्यासाठी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली जाते.
महिलांच्या तक्रारी अधिकपोलिस स्टेशनमध्ये तक्रार आल्यानंतर आधी भरोसा सेलकडे जाण्यास सांगतात. येथील पोलिसांकडून त्यांची समजूत काढून पुन्हा हा संसार रुळावर आणला जातो. पुरुषांच्या छळ होत असला तरी महिलांच्या छळाच्या सर्वाधिक तक्रारी पोलिसात नोंद होतात.
नातेसंबंधात संशय किंवा स्वतंत्र राहणीमानपती-पत्नी यांच्या स्वभावातील विविध बाबींचा अडथळा हा संसारामध्ये कुरबुरी निर्माण करत आहे. त्यातूनच अनेक नाते तुटण्यास कारणीभूत ठरत आहेत.
बहुतांश प्रकरणात तडजोडभरोसा सेल तसेच पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीनंतर प्रथम तडजोड करण्याकडेच अधिक भर दिला जातो. संसार तुटू नये अशी भूमिका घेतली जाते. दोघांच्याही समस्या सोडवून त्यांना पुन्हा एकत्र आणण्यावरच अधिक भर दिला जातो.
"मागील काही वर्षांमध्ये पत्नी पीडित पुरुषांची संख्या वाढत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे आहे. या कायद्याचा आधार घेऊन काही महिला पुरुषांना अकारण फसवितात. पत्नीपडितांची वाढणारी संख्या समाजासाठी धोकादायक आहे."- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, पत्नी पीडित संघटना, चंद्रपूर