नव्या राशन कार्डधारकांना अन्नधान्य देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:29 IST2021-05-20T04:29:50+5:302021-05-20T04:29:50+5:30

राजुरा : वर्षापासून कोविड १९ या महामारीमुळे संपूर्ण जनता भयभीत आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांच्या हाताला ...

New ration card holders should be given food grains | नव्या राशन कार्डधारकांना अन्नधान्य देण्यात यावे

नव्या राशन कार्डधारकांना अन्नधान्य देण्यात यावे

राजुरा : वर्षापासून कोविड १९ या महामारीमुळे संपूर्ण जनता भयभीत आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. अशा वेळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक गरजूंना राशनचे अन्नधान्य आधार ठरू शकते. त्यामुळे सन २०२० - २०२१ या कालावधीत नवीन राशन कार्ड काढलेल्या लाभार्थींना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या ओबीसी विभागाने केली आहे.

यासंदर्भातील निवेदन राजुराचे तहसीलदार हरीश गाडे यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, खामोनाचे माजी सरपंच कवडू पाटील सातपुते, माजी सरपंच लहू चाहरे आदी उपस्थित होते.

Web Title: New ration card holders should be given food grains