शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात नवे सत्ता समीकरण पुढे; भाजपचा उद्धवसेनेला सव्वा-सव्वा वर्षाचा नवा 'सत्ता'फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:43 IST

Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांना सत्तास्थापनेचा अधिकृत प्रस्ताव दिला असला, तरी उद्धवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांना सत्तास्थापनेचा अधिकृत प्रस्ताव दिला असला, तरी उद्धवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजपकडे २३, शिंदे गटाचा एक नगरसेवक असा २४ चा आकडा आहे. त्यात उद्धवसेनेचे सहा, वंचित बहुजन आघाडीचे दोन आणि दोन अपक्ष असे दहा जोडल्यास एकूण ३४ संख्याबळ पूर्ण होते. या संख्येच्या जोरावर भाजपकडून महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. आरक्षणाचा विचार करता महापौरपद पहिले सव्वा वर्ष भाजपकडे, तर नंतरचे सव्वा वर्ष उद्धवसेनेकडे देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला आहे. मात्र यावर उद्धवसेनेने मौन बाळगल्याने सत्ता समीकरण अडकले आहे.

दरम्यान, संख्येने सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून तीन मित्रपक्षांसह हा आकडा ३० पर्यंत जातो. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे अवघ्या चार जागांसाठी काँग्रेस सत्तेबाहेर राहण्याची शक्यता आता बळावली आहे.

उद्धवसेनेची महापौरपदासाठी 'मनस्वी' इच्छा का?

उद्धवसेना पहिल्याच टप्प्यात महापौरपदावर अडून बसल्यामागे वैयक्तिक राजकीय गणित असल्याची चर्चा आहे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांच्या पत्नी मनस्वी गिन्हे या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदा महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून, ही संधी उद्धवसेनेसाठी निर्णायक ठरू शकते.

अडीच वर्षानंतर आरक्षण बदलते. त्यावेळी महापौरपद ज्या प्रवर्गासाठी राखीव होईल, तो प्रवर्ग उद्धवसेनेकडे नसेल, तर पुढील अडीच वर्षांत उद्धवसेनेचा महापौर होणे अशक्य ठरेल. त्यामुळे आत्ताच महापौरपद मिळावे, यासाठी उद्धवसेनेचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे.

अखेर काय ठरणार?

महापौरपदाचे आरक्षण आणि वैयक्तिक राजकीय आकांक्षांनी सत्ता संघर्ष अधिक गुंतागुंतीचा झाला असून, अखेर फॉर्म्युला काय ठरतो, याकडे लक्ष लागले आहे.

भाजपचा दावा : प्रस्ताव दिला, प्रतिसादाची प्रतीक्षा

"भाजपकडे २४ नगरसेवक आहेत. उद्धवसेना व मित्रपक्ष मिळून दहा. या आधारावर सव्वा-सव्वा वर्षांचा महापौरपदाचा उद्धवसेनेला प्रस्ताव दिला आहे. त्यांनी हा प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने घ्यावा, अशी अपेक्षा आहे.- किशोर जोरगेवार, भाजप आमदार चंद्रपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: BJP proposes power-sharing formula to Uddhav Sena for mayor post.

Web Summary : BJP offered Uddhav Sena a power-sharing formula for Chandrapur mayor post: BJP for 1.25 years, Sena next 1.25. Sena's silence stalls agreement. Congress faces internal conflict.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा