शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सरकारमुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर

By admin | Updated: November 10, 2014 22:39 IST

चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा तर झाली; मात्र घोषणा झाल्यापासून हे वैद्यकीय महाविद्यालयात कोणत्या ना कोणत्या अडचणीतच येत आले. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय

मुंबईच्या चमूने केली पाहणी : जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चाचंद्रपूर : चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा तर झाली; मात्र घोषणा झाल्यापासून हे वैद्यकीय महाविद्यालयात कोणत्या ना कोणत्या अडचणीतच येत आले. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण ही खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने दोघांमध्ये कधी समन्वय साधला गेला नाही. त्यामुळे निर्माणाधिन १०० खाटांच्या रुग्णालयात सुरू होणारे हे महाविद्यालय ग्रहणात सापडले होते. मात्र आता नव्या सरकारमुळे या महाविद्यालयाचा मार्ग सूकर झाला आहे. मुंबईच्या वैद्यकीय चमूने सोमवारी चंद्रपुरात दाखल होत नव्या इमारतीची व प्रस्तावित जागेचीही पाहणी केली.चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. उद्योग म्हटले की जडवाहतूक, अपघात आलेच. त्यामुळे चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी येथील व आजबाजूच्या परिसरातील नागरिकांची मागणी होती. राज्य शासनाने चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा केली. मात्र या जागेला मंजुरी मिळणे व प्रत्यक्ष बांधकाम करून पदभरती करणे, याला बराच कालावधी लागणे अपेक्षित होते. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात १०० खाटांच्या रुग्णालयासाठी मंजुरी देण्यात आली होती. या रुग्णालयाचे चंद्रपुरात बांधकामही सुरू झाले होते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन इमारत तयार होईपर्यंत १०० खाटांच्या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाला सादर केला. वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅचचा कालावधी संपेपर्यंत नवीन इमारतीचे बांधकाम केले जावे, असेही ठरविण्यात आले होते. मात्र सार्वजनिक आरोग्य हे खाते काँग्रेसकडे आणि वैद्यकीय शिक्षण हे खाते राष्ट्रवादीकडे असल्याने श्रेयाच्या राजकारणामुळे दोन्ही खात्यांचा एकमेकांसोबत समन्वय साधला नाही. १०० खाटांचे रुग्णालय हे आमचे आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी नवी इमारत बांधण्यात यावी, अशी भूमिका सार्वजनिक आरोग्य खात्याने घेतली होती. त्यामुळे मागील वर्षीच सुरू होणारे महाविद्यालय सुरू होऊ शकले नाही. आता राज्यात भाजपाची सरकार बसली आहे. वैद्यकीय शिक्षण हे खाते सध्या ना.तावाडे यांच्याकडे आहे. आणि सार्वजनिक आरोग्य खाते स्वत: मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे आता या वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सूकर झाला आहे. (शहर प्रतिनिधी)