चंद्रपूर परिमंंडळात १६२ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:27+5:302021-02-05T07:40:27+5:30
चंद्रपूर : राज्यात ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. चंद्रपूर परिमंडळात लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ...

चंद्रपूर परिमंंडळात १६२ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या
चंद्रपूर : राज्यात ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. चंद्रपूर परिमंडळात लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या १६२ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या गुरुवार (दि. २८) पर्यंत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
राज्यात १ एप्रिल २०१८ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रथमच कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले. या धोरणाअंतर्गत महाकृषी ऊर्जा अभियानाला बुधवारी सुरुवात झाली आहे व अंमलबजावणीसाठी महावितरणने महाकृषी अभियान ॲप, एसीएफ ॲप, सौर ऊर्जा लॅण्ड बँक पोर्टल, महाकृषी अभियान धोरण- २०२० पोर्टल आदींची निर्मिती केली आहे. ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही त्यांची वाढ करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार ?
अभियानानुसार लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर व २०० मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वितरणप्रणालीद्वारे एका रोहित्राद्वारे जास्तीत-जास्त दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. महावितरणकडून कृषिपंप नवीन वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलत देणार आहे. त्यासाठी संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे