प्रगणकांना झाले व्याघ्रदर्शन

By Admin | Updated: May 23, 2016 00:52 IST2016-05-23T00:52:27+5:302016-05-23T00:52:27+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये बुद्ध पौर्णिमेला शनिवारी रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली.

Negative Reduction | प्रगणकांना झाले व्याघ्रदर्शन

प्रगणकांना झाले व्याघ्रदर्शन

२०० मचानी : ताडोबात बिबटांचीही संख्या मोठी
चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये बुद्ध पौर्णिमेला शनिवारी रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या दरम्यान, अनेक प्रगणकांना वाघासह बिबट व अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन घडले.
दरवर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने ताबोडा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांची गणना केली जाते. ही गणना करण्यासाठी वन्यजीव प्रेमींना सहभागी करून घेतले. जाते. साधारणत: एका मचानीवर चार प्रगणक असतात. त्यांच्यासोबत एक किंवा दोन वनरक्षक असतात. यावर्षी ताडोबाच्या बफर झोन क्षेत्रात ११८ तर कोअर झोन क्षेत्रात ८२ मचानी उभारण्यात आल्या होत्या. शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या दुधाळ प्रकाशात शेकडो वन्यजीव प्रेमींनी प्रगणना केली. त्यात वाघ,अस्वल, हरिण, बिबट यासह विविध प्राण्यांचे प्रगणकांना दर्शन झाले.
यासंदर्भात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गणपत गरूड यांना विचारणा केली असता, अतिशय उत्साहात आणि कोणत्या विघ्नाशिवाय ही प्रगणना पार पडल्याचे त्यांनी सांगितले. या प्रगणनेसाठी अनेकांनी आपली नावे नोंदविली होती. परंतु नाव नोंदविणाऱ्यांपैकी यावर्षी अनेकजण आलेच नसल्याची माहितीही त्यांनी दिली. आकडीवारीबाबत विचारण केली असता, अद्याप अपडेट आकडेवारी प्राप्त व्हायची असल्याचे त्यांनी सांगितले. बफर क्षेत्रात २५ वाघ, १५ बछडे, ९ बिबट दिसल्याची प्राथमिक माहिती त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. अन्य प्राण्यांचेही दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

वादळाची भीती
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे केल्या जाणाऱ्या वन्यप्राणी गणनेला दरवर्षी वादळाचा फटका बसतो. मागील दोन वर्षांपासून प्रगणक हा अनुभव घेत आहेत.मागील वर्षी बुद्ध पौर्णिमेला जोरदार वादळ आले. त्यामुळे प्रगणकांचे प्रचंड हाल झालेत. हा अनुभव लक्षात घेता, यंदाही वादळाची भीती होती. मात्र निसर्गाने साथ दिली.

Web Title: Negative Reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.