शेतकऱ्यांचा सातबारा गावातील लोकांजवळ
By Admin | Updated: May 18, 2017 01:24 IST2017-05-18T01:24:55+5:302017-05-18T01:24:55+5:30
राज्यात केंद्र पुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉर्डनायझेशन प्रोगामअंतर्गत ब्रह्मपुरी तहसील

शेतकऱ्यांचा सातबारा गावातील लोकांजवळ
चावडी वाचन : आॅनलाईन सातबारा तपासणी मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : राज्यात केंद्र पुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉर्डनायझेशन प्रोगामअंतर्गत ब्रह्मपुरी तहसील कार्यालयाद्वारे प्रत्येक गावांत सातबाऱ्याचे चावडी वाचन घेण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांचा सातबारा गावातील लोकांजवळ पोहचविण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
तालुक्यात १६ मे ते १५ जूनपर्यंत प्रत्येक गावाचे तलाठी गावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या सातबाराचे वाचन करतील. यादरम्यान शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्यामध्ये चूक आढळल्यास लाल पेनाने ती चूक लक्षात आणून द्यायची आहे. ती चूक तलाठ्याद्वा२े दुरुस्ती करुन त्या शेतकऱ्यांना ताबडतोब योग्य सातबारा उपलब्ध होणार करण्यात येणार आहे. या माध्यमातून सातबारामध्ये पारदर्शकता आणण्याचे कार्य शासनाच्या व तहसील कार्यालयातर्फे केले जाणार आहे.
या चावडी वाचन कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सातबारा दुरुस्त करुन घ्यावा. तसेच शासकीय उपक्रमात हातभार लावावा. ज्या सुटीसाठी वेळप्रसंगी श्रम, पैसा लावून कामासाठी जावे लागत होते, ते काम घरबसल्या प्राप्त करुन घ्यावे, असा या वाचन कार्यक्रमा मागील उद्देश आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.