राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
By राजेश भोजेकर | Updated: May 22, 2023 17:04 IST2023-05-22T17:03:13+5:302023-05-22T17:04:35+5:30
राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.

राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
राजेश भोजेकर
चंद्रपूर : राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.
केंद्रातील मोदी सरकारने ईडी, सीबीआय इत्यादीचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकणे, त्यांच्या व नातेवाईकांच्या घरांवर धाडी टाकून हैराण करण्याचा बेकायदेशीर सपाटा लावला आहे. अश्याच धाडसत्रात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक यांना खोट्या आरोपाखाली अकारण तुरुंगात डांबले. आता आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना ईडीच्या नोटीस पाठवून हैराण करण्याचे षडयंत्र सुरू आहे. या विरुद्ध चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देवून राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत या भावना पोहचविण्याची विनंती करण्यात आली.
अश्याच प्रकारचे निवेदने आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, सुधाकर कातकर, प्रियदर्शन इंगळे, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, सुहास बहादे, वंदन आवळे, बादल उराडे, शुभांगी साठे, बाबूभाई इसा, अनिता माउलीकर, किरण साळवी, सरस्वती गावंडे, छाया चौधरी, निर्मला नरवडे, माया देशभ्रतार, डॉ.आनंद अडबाले, शरद मानकर, माणिक लोणकर, महादेवराव पिदुरकर, दिलीप पिट्टलवार, दिगंबर दुर्योधन उपस्थित होते.