एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:37+5:302021-03-14T04:25:37+5:30

बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ...

NCC Annual Training Camp | एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिर

एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिर

बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय छात्र सेनेचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

प्रमुख अतिथी कर्नल विजय भास्कर यांनी मार्गदर्शन केले. यात कोरोना महामारीच्या काळात स्वतःला सांभाळून छात्रसैनिकांनी या शिबिराचा पूर्ण लाभ घेतला. एन.सी.सी.मध्ये सहभागी छात्रसैनिकांना सैन्यात भरती होण्यासंबंधी मार्गदर्शन करून आपला संकल्प व पूर्वतयारी पूर्ण करण्यासाठी छात्रसेना माध्यम असून, यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

आयुष्यात जिद्द आणि चिकाटी अबाधित राखून छात्रसैनिकांनी एकता आणि अनुशासनाच्या मार्गे जीवनक्रम केल्यास जीवनाला गतिशीलता येते, अशी भावना एन.सी.सी.ऑफिसर प्रा.योगेश टेकाडे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्राचार्या ज्योती भुते यांनी देश सेवेसाठी सैन्यात होण्यासाठी आवाहन केले. या कॅम्पमध्ये शस्त्र कवायत, नकाशा वाचन, एंबुश, पेट्रोलिंग परेड या विविध गोष्टी शिकविल्या गेल्या. समारोपीय सोहळ्यात निवृत्त प्राचार्य तथा मेजर डॉ.प्रभात दुबे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली व डॉ.पंकज कावरे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. या शिबिरात २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय भास्कर व एडम ऑफिसर गौस बेग यांच्या मार्गदर्शनाखाली ७ ते ११ मार्चपर्यंत एनसीसीबी आणि सी प्रमाणपत्र परीक्षेच्या छात्रसैनिकांना प्रशिक्षित करण्यात आले. एकूण १०८ एनसीसी कॅडेट्सनी सहभाग घेतला.

Web Title: NCC Annual Training Camp