Nawarda's car accident, three injured | नवरदेवाच्या कारला अपघात, तीन जखमी
नवरदेवाच्या कारला अपघात, तीन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : नागपूर - चंद्रपूर मार्गावरील मांगली (रै) जवळ चद्रपूरकडे जाणाऱ्या नवरदेवाच्या गाडीचा समोरील टायर फुटल्याने वाहन पलटी झाले. या अपघातात वाहनातील तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली. सुदैवाने नवरदेव यातून सुखरूप बचावला.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी समुद्रपूरवरून नवरदेवासह एम एच ४९ बीबी ३५०९ ही गाडी १० वºहाडासह चंद्रपूरात लग्नासाठी जात होती. दरम्यान वरोºयापासून २० किमी अंतरावर असलेल्या मांगली (रै.) जवळचा चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यातील येनय्या पंडगुलवार, कैलास बुरेलवार व सुरेश गट्टेलवार हे तीघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सेवाग्राम रूग्णालयात हलविण्यात आले. तर इतर वºहाड्यांनी त्यांना वरोरा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचारासाठी हलविण्यात आले. या वाहनात नवरदेव बसलेला होता. मात्र सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर नवरदेवासह इतर वºहाडी चंद्रपूरला रवाना झाले.


Web Title: Nawarda's car accident, three injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.