शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

नांदेडला आले जत्रेचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:19 IST

शहरापासून दूर जंगलाजवळ वसलेल्या व जेमतेम तीन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नांदेड गावाला बुधवारी जत्रेचे स्वरुप आले होते. या गावातील भूमीपुत्र दादाजी खोब्रागडे यांनी धानावर केलेल्या संशोधनाची कीर्ती देशभर पोहचली आहे.

ठळक मुद्देदिग्गज नेत्यांचीही हजेरी : राहुल गांधींना पाहण्यासाठी नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी

घनश्याम नवघडे / राजकुमार चुनारकर / संजय अघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शहरापासून दूर जंगलाजवळ वसलेल्या व जेमतेम तीन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नांदेड गावाला बुधवारी जत्रेचे स्वरुप आले होते. या गावातील भूमीपुत्र दादाजी खोब्रागडे यांनी धानावर केलेल्या संशोधनाची कीर्ती देशभर पोहचली आहे. दादाजींच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व अनेक बड्या नेत्यांची पावले बुधवारी एचएमटी धानाच्या माळरानावर पडली. आणि त्यांना बघण्यासाठी परिसरातील लोकांचे जत्थेच्या जत्थे नांदेडला एकवटले. त्यामुळे नांदेड गजबजून गेले.धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भा.रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी नांदेडला येत आहेत, अशी माहिती आ. विजय वडेट्टीवार यांच्यामुळे कळताच नांदेड परिसरात व जिल्ह्यात अचानक उर्जा निर्माण झाली. एका छोट्या गावात देशाचे तीन पंतप्रधानांचा वारसा असलेला एवढा मोठा नेता येत आहे, यावर प्रारंभी कुणाचा विश्वासच बसला नाही. मात्र खात्री झाल्यावर जो-तो नांदेडच्या दिशेने धावू लागला.बुधवारी अगदी सकाळी ९ वाजेपासूनच नांदेडकडे जाणारे रस्ते माणसांनी व वाहनांनी फुलायला लागले होते. बघता बघता अख्खे नांदेड गाव नागरिकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले. सभास्थळी जाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी करायला सुरूवात केली. राहुल गांधी काय बोलतात, राहुल गांधी कसे दिसतात, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते. यावेळी वातावरणात प्रचंड उकाडा राहुनही लोक हा उकाडा सहन करीत राहुल गांधी येण्याची वाट पाहत होते. यावेळी अनेकांना सभास्थळी जागा न मिळाल्याने लोकांनी घरावर उभे राहून राहुल गांधी यांचे भाषण ऐकणे पसंत केले.अखेर राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालू लागल्याचे दिसताच लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लोकांनी टाळ्या वाजवून राहुल गांधी यांचे उत्स्फुर्त स्वागत केले. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सजग झाली. हेलिकॉप्टरमधून उतरताच राहुल गांधी तडक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी दादाजींच्या घरी गेले. श्रद्धांजली अर्पण करून व कुटुंबीयांचे सांत्वन करून ते नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सभास्थळी येताच अगोदर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केले. राहुल यांचे मंचावर आगमन होताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाटात स्वागत केले. मंचावर आल्यानंतर मौन पाळून दादाजींना श्रद्धांजली अर्पण केली. आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्याला राहुल गांधींनी सुरूवात केली. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना समजेल, अशा भाषेतच उत्तरे दिल्याने शेतकरीही समाधानी झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.इंदिरा गांधीचा नातू पाहू देन गाशेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या राहुल गांधींना पाहण्यासाठी परिसरातील अबालवृध्दांनी हजेरी लावली होती. मात्र जागा अपुरी असल्याने गर्दीत अनेकांना राहुल गांधींना पाहता आले नाही. तरीही काही वृध्द महिला गर्दीतून मार्ग काढत इंदिरा गांधीचा नातू पाहू देन गा.. असे म्हणत समोरच्यांना विनंती करीत पुढे जाताना दिसत होत्या.काँग्रेसमध्ये चैतन्यराहुल गांधी यांच्या या कार्यक्रमामुळे नागरिक तर उत्साहात होतेच. यासोबत जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यात निर्माण झालेले हे चैतन्य पुढे काँग्रेसच्या वाटचालीत चांगलेच फायद्याचे ठरणार आहे.असे आहे नांदेड गावशहराच्या वातावरणापासून दूर संवादाचे साधनही नसलेल्या नांदेड गावाची लोकसंख्या जेमतेम तीन हजारांच्या जवळपास आहे. गावात ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत. गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ त्ते ७ पर्यत तर ८ ते १२ पर्यत खासगी शाळा आहे. यानंतरचे शिक्षण तळोधी, नागभीड, चंद्रपूर येथे घ्यावे लागते. गावात सर्व समाजाचे वास्तव्य आहे. गावात विशेष बाजारपेठ नाही. दुकानेही फार कमी आहेत. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे.घरावर चढून घेतला सभेचा आनंदराहुल गांधी यांचा जिल्हात प्रथमच शेतकऱ्यांशी चर्चा व आदरांजलीचा कार्यक्रम असल्याने उपस्थितीचा अंदाज प्रशासनाने घेतला नाही. मात्र ज्या ठिकाणी संवाद सभा होती. ती जागा अपुरी पडल्याने नागरिक घरावर चढून तर काहींनी घरावरचे कवेलू काढून डोके बाहेर येईल, अशी व्यवस्था करून सभेचा आनंद घेतला.चार दिवसांपासूनच रेलचेलसर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या दादाजी खोब्रागडे यांनी धानावर अनेक संशोधन केले. त्यामुळे दादाजी अवघ्या देशाला परिचित झाले होते. अशातच खोब्रागडे यांचे ३ जूनला निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रही ढवळून निघाले. त्यामुळे मागील चार दिवसांपासून नांदेड गावात मंत्री, आमदार, खासदार यांच्या या गावात भेटी व रेलचेल सुरू होती.घरोघरी लागली नास्त्याची दुकानेगावात देशाचे मोठे नेते येत असल्याने नांदेड गाव हुरळून गेले होते. मंगळवारपासूनच गावात गर्दी उसळू लागली. बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा अंदाज बांधून अनेकांनी चहा, चिवडा, पोहे व भजे, पाणी पुरी, आदीची दुकाने लावली होती. एरवी व्यवसाय नसतानाही बुधवारी घराघरासमोर नास्त्याची दुकाने दिसत होती.वडेट्टीवारांचे दिल्ली कनेक्शनदादाजी खोब्रागडे यांचे कार्य मोठे होते. त्यांनी आपल्या संशोधनातून शेतकºयांसमोर अनेक मार्ग खुले केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची महती थेट दिल्लीपर्यंत पोहचविण्याचे काम आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्यामुळेच राष्ट्रीय नेते राहुल गांधी नांदेड या छोट्याशा गावी आले आणि नांदेड पंचक्रोशित प्रसिध्द झाले.