चंद्रपुरात राष्ट्रीय ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धा

By Admin | Updated: March 4, 2016 01:03 IST2016-03-04T01:03:36+5:302016-03-04T01:03:36+5:30

चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग स्पोर्टस् अकादमी, राष्ट्रीय वन पर्यावरण संरक्षण समिती तथा महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघ ...

National Judo karate sports competition at Chandrapur | चंद्रपुरात राष्ट्रीय ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धा

चंद्रपुरात राष्ट्रीय ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धा

देशभरातील ५०० विद्यार्थी सहभागी : पुरुषांमध्ये इलाही खान तर महिलांमध्ये रूचिका वाळके अजिंक्य
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग स्पोर्टस् अकादमी, राष्ट्रीय वन पर्यावरण संरक्षण समिती तथा महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघ चंद्रपूरच्यावतीने स्थानिक महानगरपालिका प्रांगणात १५ वी खुली राष्ट्रीय ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धा झाली. या स्पर्धेत २७ पेक्षा जास्त चमूंनी सहभाग घेतला. मंगळवारी स्पर्धेचा समारोप झाला.
प. बंगाल, जबलपूर, आसाम, कलकत्ता येथून जवळपास ५०० पुरूष व महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. पुरुषांच्या खुल्या चॅम्पियनशिपमध्ये वर्धाचे इलाही खान यांना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. पुरुषांमध्येच द्वितीय क्रमांक पश्चिम बंगालचे सोहेल बेग, नागपूर येथील दयाल धवल तृतिय, आशिष नान्दे चतुर्थ तर प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून अश्विन चाफेकर याला सन्मानित करण्यात आले. मुलींध्ये प्रथम पारितोषिक रूचिका वालके, किर्ती राऊत द्वितीय, तृतिय पारितोषित शुभांगी गोकुला तर चौथे पारितोषिक प्रतीक्षा सोनटक्के यांना प्रदान करण्यात आले. पुरूष विजेत्यांना प्रथम बक्षिस नगर राशी २५ हजार, २० हजार, १५ हजार, १० हजार तर प्रोत्साहन पर बक्षिस ३ हजार रुपयांचे तर महिलांना प्रथम १२ हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार तर चतुर्थ बक्षिस ३ हजार रुपयांचे देण्यात आले. या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, एमएसईबीच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ राकाँ नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भगवान पाटील, अ‍ॅड. वामनराव चटप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, दिलीप झाडे, हिराचंद बोरकुटे, वामनराव झाडे, डी.के. आरीकर, राजू कोटकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा बेबी उईके, ज्योती रंगारी, प्रा. एस.टी. चिकटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर ज्युडो कराटे बॉक्सिंग स्पोर्टस् अकादमी तथा महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सोमेश्वर येलचलवार, वसंत येलचलवार, राजु बिट्टूरवार, दिनेश एकवनकर, रकिबभाई, गजानन हिरेमट, सुभाष थोरात, प्रवीण मोरे, ज्योती जयपुरकर, करुणा सोमेश्वर येलचलवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: National Judo karate sports competition at Chandrapur