भद्रावती येथे राष्ट्रीय ग्राहक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:37 IST2020-12-30T04:37:57+5:302020-12-30T04:37:57+5:30

भद्रावती : अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ...

National Consumer Day at Bhadravati | भद्रावती येथे राष्ट्रीय ग्राहक दिन

भद्रावती येथे राष्ट्रीय ग्राहक दिन

भद्रावती : अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष मधसुदन भुमकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन भद्रावती नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी भद्रावतीचे उपअभियंता सचिन बदखल, सहा पोलीस पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, विवेकानंद महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. उमाटे, महिला सदस्य भुमकर यांची उपस्थिती होती.

शोषण मुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायतीची भुमीका यावर भुमकर यांनी बाजू मांडली, सचिन बदखल यांनी विजबील व ग्राहकाच्या समस्या आणि कर्तव्य यावर मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी पिदुरकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहकांचे हक्क याबद्दल माहिती दिली. महिला सदस्य भुमकर यांनी महिला हक्क व कायदे बद्दल बाजु मांडली. संचालक वामण नामपल्लीवार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, त्याची व्याप्ती, कायद्यात झालेले नविन बदल याबद्दल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उत्तम घोसरे, संचालन वामन नामपल्लीवार, वार्षिक कार्याचे अहवाल वाचन अशोक शेंडे तर आभार पुरूषोत्तम मत्ते यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रवीण चिमुरकर, वसंत वरटे, गुलाब लोणारे, गोपीचंद कांबळे यांनी केले.

Web Title: National Consumer Day at Bhadravati