अंमलनाला धरण पर्यटनाच्या दर्जापासून वंचित

By Admin | Updated: May 22, 2015 01:20 IST2015-05-22T01:20:15+5:302015-05-22T01:20:15+5:30

शहराच्या दक्षिणेस उंच पहाड व हिरव्यागार रम्य परिसरात असलेले अंमलनाला धरण गडचांदूर तथा परिसरातील नागरिकांसाठी चौपाटी ठरले आहे.

Narmada river damaged by tourism status | अंमलनाला धरण पर्यटनाच्या दर्जापासून वंचित

अंमलनाला धरण पर्यटनाच्या दर्जापासून वंचित

गडचांदूर : शहराच्या दक्षिणेस उंच पहाड व हिरव्यागार रम्य परिसरात असलेले अंमलनाला धरण गडचांदूर तथा परिसरातील नागरिकांसाठी चौपाटी ठरले आहे. अनेक पर्यटकही या ठिकाणी भेटी देतात. मात्र हे स्थळ पर्यटनाच्या दर्जापासून वंचित असल्याने विकास थांबला आहे.
पहाटे सकाळी व सायंकाळी नागरिकांची या ठिकाणी गर्दी असते. शासनाने या धरणाला पर्यटनाचा दर्जा देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी नागरिकांची मागणी आहे. अंमलनाला धरण निसर्गरम्य परिसरात आहे. या परिसरात पाऊल टाकताच मनाला प्रसन्न वाटते. या तलावाला तसेच जवळच असलेल्या प्राचीन माणिकगड किल्ला, विष्णु मंदिर, शंकरदेव मंदिर, माता मंदिरला दरवर्षी हजारो नागरिक भेटी देतात. पर्यटनक्षेत्र म्हणून या परिसराचा विकास झाला. पर्यटकाच्या संख्येत आणखी वाढ होईल. निसर्गाने विविध रंगाची उधळण केलेल्या व वनवैभवाने समृद्ध असलेल्या हिरव्यागार रम्य परिसरात अंमलनाला धरणाची निर्मिती १९८५ मध्ये झाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. या प्रकल्पात २२.७० दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. जलाशयाचा उपयुक्त पाणीसाठा २१.२० दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पाची लांबी १६०८ मीटर, रूंदी ५५० मीटर, उंची २६.५७ मीटर आहे. जलाशयाची उपयोगिता लक्षात घेता या जलाशयाच्या सांडव्याची उंची एक मीटर वाढविण्याचे काम तीन वर्षापूर्वी झाले. या कामावर शासनाने दोन कोटी रुपये खर्च केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागात शेती व्यवसाय सुजलाम सुफलाम करण्याच्या उदात्त हेतूने या प्रकल्पाची निर्मिती झाली. मात्र येथील औद्योगिक कारखाने, सिमेंट उद्योग आडवे आले. याच धरणातून गडचांदूर शहराला पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित होणार असून या योजनेचे काम सुरू आहे. अंमलनाला जलाशय पूर्ण भरल्यानंतर सांडवा व प्रपातावरून वाहत असणाऱ्या पाण्याचे दृष्य विलोभनीय दिसते. पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अंमलनाला धरण एक सुंदर पर्यटनस्थळ बनू शकते. बोटींगची व्यवस्था केल्यास पर्यटकांची संख्या निश्चित वाढेल.
शासनाने या तलावाकडे केवल सिंचनची एक सोय या दृष्टीने न पाहता पर्यटनस्थळच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. शासनाने रिसोर्टच्या माध्यमातून बोटींग, बगिचा, रेस्टारंट केल्यास पर्यटकांना फायदेशीर ठरेल. (वार्ताहर)

Web Title: Narmada river damaged by tourism status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.