नागभीड येथे १०८ कुंडीय शिव महारूद्र यज्ञ
By Admin | Updated: February 22, 2017 00:48 IST2017-02-22T00:48:22+5:302017-02-22T00:48:22+5:30
विश्वशांती, मानव कल्याण व गोवंश रक्षणासाठी महर्षी मस्त दादूराम बापू मनोल्यान मिशनच्या वतीने नागभीड येथे १०८ कुंडीय शिव महारूद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागभीड येथे १०८ कुंडीय शिव महारूद्र यज्ञ
२६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत : विदर्भातील पाच जिल्ह्यांमधून येणार भाविक
नागभीड : विश्वशांती, मानव कल्याण व गोवंश रक्षणासाठी महर्षी मस्त दादूराम बापू मनोल्यान मिशनच्या वतीने नागभीड येथे १०८ कुंडीय शिव महारूद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यातील लोक सहभागी होण्याचे अपेक्षित आहे.
२६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होत असलेल्या या यज्ञाची जय्यत तयारी नवखळाजवळच्या चिचोली डोंगरी टेकडीच्या पायथ्याशी सुरू आहे. यासाठी अंदाजे १० एकराच्या परिसरात सफाई करण्यात आली असून त्यावर मंडप उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
या यज्ञासाठी विदर्भातील पाच जिल्ह्यातील भाविक येण्याचे अपेक्षित आहे. तसेच गुजरात, राजस्थान येथील भक्तगण व साधूसंत सहभागी होणार आहेत. त्यासाठी १५०० लोकं निवासी राहू शकतील एवढी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी यज्ञ आहुती आणि १ मार्च रोजी पूर्णाहुती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञासाठी १०८ कुंड तयार करण्यात येत असून एका कुंडावर पाच याप्रमाणे १०८ कुंडावर ५४० जोडपे आहूती अर्पण करणार आहेत. विदर्भाच्या पातळीवर एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर नागभीड येथे प्रथमच या यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून यज्ञाच्या आयोजनात कोठेही उणीव राहू नये, यासाठी आयोजक कशोशीचे प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)