शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड पं.स. चे नगरपंचायतीला समर्थन

By admin | Updated: March 11, 2016 01:41 IST

नागभीड नगरपरिषद होत नसेल तर किमान नगरपंचायत तरी स्थापन करावी आणि नागभीडचा विकास साधावा,

मासिक सभेत ठराव : शासनाने दखल घेण्याची मागणीनागभीड : नागभीड नगरपरिषद होत नसेल तर किमान नगरपंचायत तरी स्थापन करावी आणि नागभीडचा विकास साधावा, या मताशी नागभीड पंचायत समिती अनुकूल असून तसा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला आहे.शासनाच्या एका धोरणात्मक निर्णयानुसार राज्यातील तालुका स्तरावरील ग्रामंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुकास्थळे नगरपंचायती बनल्या असून अपवाद फक्त नागभीड ग्रामपंचायत ठरली आहे. याला कारण येथील आ. बंटी भांगडिया यांचा पूर्ण कल नगरपरिषदेकडे असला तरी, नगरपरिषदेसाठी पुरेशी लोकसंख्या जुळत नसल्याने नगरपरिषदेचे घोडे अडून आहेत.नगरपरिषदेसाठी किमान २५ हजार लोकसंख्येची अट आहे. ही लोकसंख्या नागभीड पूर्ण करु शकत नाही आणि म्हणूनच नवखळा, बामणी, डोंगरगाव, चिखलपरसोडी, त्रिकेश्वर, तुकूम, तिव्हर्ला ही गावे समाविष्ट करुन घेण्याचा पर्याय समोर आला. तशी तयारीही करण्यात आली. पण नंतर आमची गावे नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट झाली तर भविष्यात अनेक त्रासांना सामोरे जावे लागेल, या निमित्त्याने यातील काही गावांनी नगरपरिषदेत समाविष्ट होण्यास नकार दिला. त्यामुळे नागभीड नगरपरिषदेचे भविष्य आज तरी अंधातरीच दिसत आहे. म्हणूनच नगरपरिषदेला पर्याय म्हणून नगरपंचायतीची मागणी करुन तिची स्थापना करण्यास काय हरकत आहे, अशा प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत. नागभीड येथे नगरपंचायतीची स्थापनेचा पर्याय निघाल्यास या नगर पंचायतीमध्ये नवखळा, सुलेझरी आणि भिकेश्वर या गावांना समाविष्ठ करुन घेण्यास काहीच हरकत नाही. कारण ही गावे आता अलग अलग राहीलेच नाही तर एकमेकांना जुळून गेली आहेत. या गावांची मिळून एक सर्वांग सुंदर नगर पंचायत होऊ शकते. नागभीड पंचायत समितीने घेतलेल्या ठरावात केवळ नागभीडचाच उल्लेख केला असला ती नवखळा, सुलेझरी आणि भिकेश्वर या गावांनाही समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय झाला तर नागभीड पंचायत समितीने ने आडकाठी आणून नये. सद्यस्थितीत नगर विकास मंत्रालयाकडून नगरपचायतींना निधी जे वितरण केले आहे ते लक्षणीय आहे. नागभीडलाही विकासासाठी असे अनुदान हवे. (तालुका प्रतिनिधी)