शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडमध्ये ओपन जिम व बगिच्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

नागभीड : नागभीड नगर परिषद झाल्यापासून नागभीड शहराची वाढ झपाट्याने होत आहे. वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन नगर परिषदेने ...

नागभीड : नागभीड नगर परिषद झाल्यापासून नागभीड शहराची वाढ झपाट्याने होत आहे. वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन नगर परिषदेने ओपन जिम व छोट्या बगिच्यांच्या निर्मितीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

गेल्या काही वर्षात शहराच्या भोवती अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यात समता कॉलनी, वसुंधरा नगर, लक्ष्मी नगर,पटवारी ले - आऊट, सम्राट अशोक नगर, प्रगती नगर,विद्या नगर, आदर्श कॉलनी, मुसाभाई नगर, लालाजी नगर, फ्रेंडस् काँलनी, सुंदर नगरी, सिद्धी विनायक, अशा अनेक वसाहतींचा यात समावेश आहे. अनेक वसाहती निर्माण होत आहेत. काही वसाहती निर्मानाधीन आहेत.

नागभीड शहर नागपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्हा स्थळांना मध्यवर्ती असल्याने अनेक चाकरनामे नागभीडला आता पसंती द्यायला लागले असून येथील वसाहतीमधील भूखंडांची विक्रीही जलदगतीने होत आहे. अनेक टोलेजंग इमारती व बंगले या वसाहतींमध्ये उभे होत असले आणि लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या वसाहतीमध्ये अद्यापही ओपन जिम व बगिच्याची निर्मिती करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षात निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने शहरात जेष्ठ नागरिकांची भर पडत आहे. या जेष्ठ नागरिकांना वेळ कुठे आणि कसा घालवावा, असा प्रश्न भेडसावत आहे. शहरात एखाद्या बगिच्याची निर्मिती झाल्यास जेष्ठ नागरिकांसमोर निर्माण होत असलेल्या समस्येचे सहज निराकरण होऊ शकते. याच बगिच्यांमध्ये ओपन जिमच्या माध्यमातून व्यायामाची साधने उपलब्ध करून दिल्यास मुले व तरुणांनाही दिलासा मिळू शकतो.

बॉक्स

२० मोकळे भूखंड

वसाहतीच्या नियमानुसार प्रत्येक वसाहतीत ‘ओपन स्पेस’ म्हणून मोकळे भूखंड ठेवण्यात आले आहेत. शहरात अशा मोकळ्या भूखंडांची संख्या २० च्या आसपास असल्याची माहिती आहे. यातील काही मोठ्या भूखंडावर ओपन जीम व बगिच्याची निर्मिती करण्यात आल्यास ते सर्वांना सोयीचे ठरू शकते. नागभीड नगर परिषदेने गेल्या तीन चार वर्षात ३८ कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते व बाजाराच्या विकासासाठी व इतर अनेक कामासाठी मोठा निधी मंजूर करून आणला आहे. असाच बगिच्याच्या निर्मितीकरिता निधीसाठी शासनाकडे साकडे घालावेत अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बॉक्स

रेल्वेच्या बालउद्यानातही सुविधांचा अभाव

येथील रेल्वे विभागाने बालउद्यानाची निर्मिती केली असली तरी या बालउद्यानात सुविधांचा अभाव आहे. येथे उपलब्ध असलेल्या काही साधनांवर रेल्वे परिसरात वास्तव्यास असलेली मुले समाधान मानून घेत आहे. रेल्वेस या उद्यानाचा विकास करण्यास अनेक संधी आहेत. मात्र रेल्वेचेही या उद्यानाकडे दुर्लक्ष आहे.

कोट

ओपन जिमसंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. हे जिम प्रत्येक प्रभागात प्रस्तावित करण्यात आले आहेत. याच ओपन जिममध्ये झाडे व इतर सुविधांची निर्मिती करून बगिचे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

- गणेश तर्वेकर, उपाध्यक्ष, न.प. नागभीड