नागभीड - नागपूर जुनी नँरोगेज रेल्वे लाईन उधळण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 05:00 AM2021-03-08T05:00:00+5:302021-03-07T23:45:02+5:30

नागभीड नागपूर हा नँरोगेज मार्ग सुरू असताना या मार्गावरून गाड्यांचे चार टायमिंग सुरू होते. पण ब्राडगेज मार्गाचे त्वरित काम सुरू करण्याच्या नावाखाली २५ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण गाड्यांचे टायमिंग बंद करण्यात आले. या बाबीस आता सव्वा वर्षाचा कालावधी होत आहे. मात्र कामाची कोणतीही  गती दिसत नव्हती. या गाड्यांनी चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील हजारो प्रवासी रोज प्रवास करायचे. मात्र या गाड्याच बंद करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

Nagbhid-Nagpur old narrow gauge railway line begins to crumble | नागभीड - नागपूर जुनी नँरोगेज रेल्वे लाईन उधळण्यास सुरूवात

नागभीड - नागपूर जुनी नँरोगेज रेल्वे लाईन उधळण्यास सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्देब्राडगेजसाठी ७०८ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागपूर ब्राँडगेज रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली नसली तरी जुना नँरोगेज रेल्वे मार्ग उधळण्यास सुरूवात करण्यात आली आहे.  नागभीडपासून समोर भिवापूरकडे हा मार्ग उधळण्यात येत आहे.
नागभीड नागपूर हा नँरोगेज मार्ग सुरू असताना या मार्गावरून गाड्यांचे चार टायमिंग सुरू होते. पण ब्राडगेज मार्गाचे त्वरित काम सुरू करण्याच्या नावाखाली २५ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण गाड्यांचे टायमिंग बंद करण्यात आले. या बाबीस आता सव्वा वर्षाचा कालावधी होत आहे. मात्र कामाची कोणतीही  गती दिसत नव्हती. या गाड्यांनी चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील हजारो प्रवासी रोज प्रवास करायचे. मात्र या गाड्याच बंद करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. आताजुनी नँरोगेज रेल्वे लाईन उधळण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. या कामाने ब्राँडगेज मार्गाचे काम लवकरच  सुरू होईल,  अशी आशा व्यक्त होत आहे.

ब्राडगेजसाठी ७०८ कोटींचा खर्च
नागभीड - नागपूर हा रेल्वे मार्ग १०६ किमी लांबीचा असून या रेल्वे मार्गाचे ब्राँडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी ७०८ कोटी ११ लाख रूपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार आहे. 

 

Web Title: Nagbhid-Nagpur old narrow gauge railway line begins to crumble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे