अपघातात मायलेकी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:00 IST2019-02-16T21:59:47+5:302019-02-16T22:00:05+5:30
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा शहराच्या आनंदवन चौकाननिक दुचाकीला ट्रकची मागून धडक बसली. यात दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार तर पिता गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली.

अपघातात मायलेकी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा शहराच्या आनंदवन चौकाननिक दुचाकीला ट्रकची मागून धडक बसली. यात दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार तर पिता गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. एम.एच. ३४ के डब्ल्यु. ४१६३ या प्लेझर दुचाकी वाहनाने किशोर मिलमिले (४५) रा. श्रीनगर सिटी, वरोरा हे आपल्या कुटुंबासोबत आनंदवन चौकातून येत होते. दरम्यान, मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील अश्विनी किशोर मिलमिले (३५) व समृध्दी किशोर मिलमिले (७) या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर किशोर मिलमिले हे गंभीररित्या जखमी झाले.