थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर नगर पालिका वाजविणार डफडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST2020-03-23T05:00:00+5:302020-03-23T05:00:19+5:30
वरोरा न.प.ची मालमत्ता कराची वसुली दरवर्षी साधारणत: ७४ टक्के होते. त्यानंतर २६ टक्के मालमत्ताधारक कर अदा करीत नाही. २६ टक्केमध्ये ज्यांना कर अधिक आला मालमत्ता धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये असलेले भांडणे यामुळे कर अदा केला जात नाही. परंतु अशा कर धारकाच्या व्यक्तीरिक्त जे मालमताधारक दोन वर्ष व त्यापेक्षा अधिक काळात मालमता कर थकविला असेल अशांची नावे शोधणार आहे.

थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर नगर पालिका वाजविणार डफडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : दोन वर्षे व त्यापेक्षा अधिक काळापासून न.प. वरोराकडे मालमत्ता करभरणा केला नाही. त्या मालमत्ता धारकांना वारंवार नोटीस व सूचना देवूनही काही उपयोग झाला नाही अशा थखित मालमत्ता धारकांच्या घरासमोर मालमत्ता कर अदा करावा, याकरिता न.प. वरोराचे पथक येत्या काही दिवसांपासून डफडे वाजविणार आहे.
वरोरा न.प.ची मालमत्ता कराची वसुली दरवर्षी साधारणत: ७४ टक्के होते. त्यानंतर २६ टक्के मालमत्ताधारक कर अदा करीत नाही. २६ टक्केमध्ये ज्यांना कर अधिक आला मालमत्ता धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये असलेले भांडणे यामुळे कर अदा केला जात नाही. परंतु अशा कर धारकाच्या व्यक्तीरिक्त जे मालमताधारक दोन वर्ष व त्यापेक्षा अधिक काळात मालमता कर थकविला असेल अशांची नावे शोधणार आहे. याकरिता दोन भरारी पथकही नेमण्यात आले आहे. थकीत मालमत्ताधारकांना पूर्वी नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर नगर परिषदेचे भरारी पथक त्यांच्या घरासमोर खुर्च्या टाकूण बसणार, त्यानंतर डफडे वाजविले जाणार व थकित मालमत्ता धारकांची यादी थकीत करासह वर्तमान पत्रात प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती नगर परिषद मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी दिली. येत्या ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर जास्तीत जास्त जमा झाला पाहिजे याकरिता वरोरा नगर परिषदेच्यावतीने ही व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. नगर परिषदेचे मुख्य स्त्रोत कर मालमत्ता असल्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
उघड्यावर मांस विक्री फौजदारी कारवाई
मटण मार्केटमध्ये व्यवसायिकांना गाळे उपलब्ध करून दिले आहे. मटण मार्केटच्या आवारातील व्यावसायिकांना व्यवसाय करावा असे नमूद असताना काही विक्रेते मटण मार्केटसमोर रस्त्याच्या कडेला मांस विक्री करतात. त्यांना वारंवार सूचना नगर परिषदेच्यावतीने देण्यात आल्या, परंतु काही व्यवसायी मटण मार्केटच्या बाहेर मांस विक्री करीत आहे. अशांविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देवून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.