घंटागाडी कामगारांच्या बेमुदत संपाने मनपा हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:19 AM2019-08-20T00:19:36+5:302019-08-20T00:20:24+5:30

चंद्रपूर शहरांमध्ये कचरा संकलन करणारे घंटागाडी कामगार तसेच वाहनचालक यांनी आज १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. ंंएरवी सकाळी ६ वाजतापासून सुरू होणाऱ्या या कामगारांची लगबग आज बंद होती. एकाही घरी हे कामगार कचरा संकलनासाठी गेले नाही.

Municipal corporation was shaken by the unpaid wealth of workers | घंटागाडी कामगारांच्या बेमुदत संपाने मनपा हादरली

घंटागाडी कामगारांच्या बेमुदत संपाने मनपा हादरली

Next
ठळक मुद्देचंद्रपूरकरांची गैरसोय टळली : सहा तासात कामगारांच्या मागण्या मान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरांमध्ये कचरा संकलन करणारे घंटागाडी कामगार तसेच वाहनचालक यांनी आज १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. ंंएरवी सकाळी ६ वाजतापासून सुरू होणाऱ्या या कामगारांची लगबग आज बंद होती. एकाही घरी हे कामगार कचरा संकलनासाठी गेले नाही. त्यामुळे चंद्रपूरकरांचीही मोठी गैरसोय झाली. यामुळे महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. त्यामुळे अवघ्या सहा तासात कामगारांच्या मागण्या मनपा प्रशासनाने मान्य केल्या आणि कामगारांचा संप पाच तासातच यशस्वीरित्या गुंडाळला.
मागील अनेक महिन्यांपासून जन विकास कामगार संघाच्या माध्यमातून घंटा गाडीवर काम करणाºया कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पप्पु देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत १८ जून २०१९, २७ जुलै २०१९ रोजी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत लेखी निवेदन दिले. २९ जुलै रोजी सर्व कामगारांनी महानगरपालिकेसमोर निदर्शने आंदोलन करून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी स्मरणपत्रसुद्धा दिले. मात्र वारंवार लेखी मागणी करूनही मनपा प्रशासन व सीडीच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यामुळे जन विकास कामगार संघाने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. यानंतर मनपा प्रशासनाने तडकाफडकी काल १८ आॅगस्टला रविवारी सुटीच्या दिवशी कामगारांच्या समस्याबाबत बैठक लावण्याचे पत्र काढण्यात आले. आज सोमवारी सकाळी ७ वाजतापासून घंटागाडी कामगारांनी बेमुदत काम बंद सुरू केल्यानंतर साडेदहा वाजता महानगर पालिकेतील आयुक्तांच्या सभा कक्षामध्ये बैठक सुरू झाली. या बैठकीला मनपाचे उपायुक्त बोकडे, जन विकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख, स्वच्छता विभागाचे संतोष गर्गेलवार, सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशनचे प्रतिनिधी समर्थ, सुपरवायझर अविनाश कोतपल्लीलवार,रतन गायकवाड, गौरव तपासे, डोंगरे, कोंडबाजी मून, महेश गुरुदेव उपस्थित होते.

काढलेल्या कामगारांना पुन्हा घेतले
राजकुमारी छतरे, सरोज अंडेलकर व डोंगरे या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. दरम्यान, आजच्या आंदोनलनानंतर या कामगारांना पूर्ववत घेण्याचे तसेच त्यांचा कामावरून कमी केलेल्या दिवसांचा पगार देण्याचेसुद्धा मनपा उपायुक्त बोकडे व सीडीसी व्यवस्थापनाने मान्य केले.

Web Title: Municipal corporation was shaken by the unpaid wealth of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप