राकाँ युवती काँग्रेसतर्फे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST2021-05-21T04:29:00+5:302021-05-21T04:29:00+5:30

चंद्रपूर : चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे केंद्र सरकारने रासायनिक खते, पेट्रोल, डिझेलचे दर वाढविल्याच्या निषेधार्थ आंदोलन करून निषेध ...

Movement by Rakan Yuvati Congress | राकाँ युवती काँग्रेसतर्फे आंदोलन

राकाँ युवती काँग्रेसतर्फे आंदोलन

चंद्रपूर : चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे केंद्र सरकारने रासायनिक खते, पेट्रोल, डिझेलचे दर वाढविल्याच्या निषेधार्थ आंदोलन करून निषेध नोंदविला.

नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहेत. केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ केली. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीही वाढविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचेही त्यांनी म्हटले आहे

याचा निषेध म्हणून चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना नियमाचे पालन करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष प्रज्ञा पाटील, शहर सचिव वर्षा बामनवाडे, राणी येलेकर, कविता तेलंग, ममता चालखुरे, खुशी जेसाभाटी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Movement by Rakan Yuvati Congress