वेगळ्या विदर्भ राज्यासाठी खासदारांच्या घरासमोर आंदोलन
By Admin | Updated: August 3, 2014 00:00 IST2014-08-03T00:00:35+5:302014-08-03T00:00:35+5:30
दिल्ली येथे झालेल्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील खासदार हंसराज अहीर यांच्या घरासमोर शनिवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी खासदारांच्या घरासमोर आंदोलन
चंद्रपूर : दिल्ली येथे झालेल्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील खासदार हंसराज अहीर यांच्या घरासमोर शनिवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
छोटूभाई पटेल हायस्कुलपासून शेकडो सदस्यांसह माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी विदर्भ राज्य समितीचे किशोर पोतनवार, अॅड. हरिशचंद्र बोरकुटे, समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, अरुण नवले, प्राचार्य अनिल ठाकुरवार, पंचायत समिती सदस्य रवी गोखरे, प्रल्हाद पवार, अनंता गोडे, सिंधू बारसिंगे, श्रीधर बलकी,मधु चिंचोलकर आदींची उपस्थिती होती.
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. दरम्यान खासदार हंसराज अहीर यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून आपणही वेगळ्या विदर्भाचे समर्थक आहोत. यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर ‘वेगळ्या विदर्भाची गरज का?’ याविषयावर मार्गदर्शन केले. विदर्भातील खासदारांनी वेगळ्या विदर्भासाठी संसदेत मागणी रेटून धरावी यासाठी ठिय्या आंदोलन असल्याचे अॅड. वामनराव चटप यांनी सांगून सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंदोलकांसह हे आंदोलन चालविले. (नगर प्रतिनिधी)